क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

हातात काम नाही.. घरात पैसा नाही.. लाॅकडाऊनला कंटाळून पतीने घेतला गळफास

पिंपरी(वास्तव संघर्ष)गेली दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या गरीबांची हेळसांड होत आहे . त्यातच पत्नीने घरखर्चाला पैसे मागितल्याने पती आणि पत्नी या दोघांत किरकोळ भांडण झाले . यामुळे आलेल्या नैराश्यातून पतीने गळफास घेतला . ही घटना रविवारी ( दि . २४ ) रात्री भोसरी येथे घडली . सध्या पतीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत .

प्रवीण गुलाबराव शेलार ( वय ४२ , रा . संत तुकाराम नगर , आळंदी रोड , भोसरी ) असे गळफास घेतलेल्या पतीचे नाव आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , प्रवीण हे पेंटर आहेत . पत्नी दोन मुले असा त्यांचा परिवार आहे . लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने त्यांना काम मिळाले नाही . त्यामुळे घरात पैशाची चणचण जाणवत आहे . त्यातच प्रवीण यांच्या पत्नीने रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घरखर्चासाठी पतीकडे पैशांची मागणी केली . या कारणावरून पती पत्नीमध्ये किरकोळ भांडण झाले . त्यानंतर पत्नी बाजुलाच राहणाऱ्या आपल्या जावेकडे गेली . त्यावेळी दोन मुले बाहेर अंगणात खेळत होती . पती प्रवीणने दरवाजा लावून घेतल्याचा आवाज ऐकून पत्नी घरी आली .

Share this: