बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

डॉ. संतोष बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका लोकार्पण, रक्तदान व आरोग्य तपासणी संपन्न

पिंपरी (वास्तव संघर्ष ) : ज्या समाजात आपण प्रगती करतो त्या समाजासाठी आपण काही देणं लागतो, पैसा अनेकांकडे असतो पण खऱ्या अर्थाने समाजासाठी काही भरीव करण्याची इच्छा आणि जिद्द मोजक्या लोकांकडे असते. त्यातलेच एक मोशीतील बारणे कुटुंब.. त्यांचे सामाजिक काम समाजाला प्रेरणा देणारे असून त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. असे भाजपा शहराध्यक्ष व भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

मोशी येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष बारणे यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून त्यांच्या कर्तव्यम फाउंडेशनच्या माध्यमातून अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका लोकार्पित केली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन केले होते.कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी आमदार महेश लांडगे बोलत होते. देहूरस्ता मोशी येथे आयोजित या कार्यक्रमात परिसरातील 512 नागरिकांनी आरोग्य तपासणी करवून घेतली तसेच 354 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच अत्याधुनिक सुविधांसह युक्त असणारी कार्डियाक रुग्णवाहिका यावेळी लोकार्पित करण्यात आली. येत्या काळात परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक वेळी हि रुग्णवाहिका मोफत सेवा देणार आहे. सध्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव असल्यामुळे कार्यक्रमात येणाऱ्या सर्व नागरिकांची थर्मल स्क्रीनिंग द्वारे तापमान तपासणी करण्यात आली तसेच सॅनिटायजिंग टनेल च्या माध्यमातून निर्जंतुकीकरणाची व्यवस्थाही यावेळी करण्यात आली होती.

सर्वांना मास्क व ग्लोव्हस वाटप करण्यात आले. सर्वानी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी आदित्य बिर्ला हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल मोशी, डॉ. थोरात क्लिनिक यांच्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली तसेच मोरया ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पडले. उपस्थित नागरिकांना कोरोनाशी लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आर्सेनिक अल्बम 30 या होमियोपॅथीक औषधांचे वाटपही करण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, भोसरी एमआयडीसी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, नगरसेवक सागर हिंगणे, उद्योजक गणेश जाधव, अमोल मारणे, प्रदीप तापकीर, निलेश बोराटे, रेड स्वस्तिक संस्थेचे रोशन मराठे, विजय बोत्रे, सामाजिक कार्यकर्ते राकेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

रेड स्वस्तिक सोसायटीच्या मानद संचालक पदी डॉ. संतोष बारणे

जगातील अनेक देशांमध्ये आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या रेड स्वस्तिक सोसायटी चे पुणे महाराष्ट्र शाखेचे पदाधिकारी रोशन मराठे तसेच विजय बोत्रे यांनी डॉ. संतोष बारणे यांच्या आरोग्य क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले आणि सोसायटीच्या मानद संचालक पदी डॉ. बारणे यांची अधिकृतपणे निवड केली. त्यांच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून रेड स्वस्तिक सोसायटी येत्या काळात आरोग्य क्षेत्रात लक्षणीय काम करेल अशी आशा यावेळी डॉ. संतोष बारणे यांनी व्यक्त केली.

मोशीतील नागेश्वर महाराज मंदिर निर्जंतुकीकरण

डॉ. संतोष बारणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोशी गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज मंदिराचे अत्याधुनिक स्वच्छता यंत्रणेद्वारे पूर्णपणे निर्जंतुकिकरण करवून घेतले. यासाठी क्रिएटिव्ह हायटेक इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस यांनी सहकार्य केले. मोशी ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेले नागेश्वर महाराज मंदिर निर्जंतुक केल्यामुळे ग्रामस्थांनी डॉ. बारणे यांचे आभार मानले.

सामाजिक कामांचा वसा जपणारे कर्मयोगी व्यक्तिमत्व डॉ. संतोष बारणे

डॉ. संतोष बारणे हे एक यशस्वी उद्योजक म्हणून तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरले आहेत. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे, अनेक राष्ट्रीय खेळाडूंना त्यांनी घडवले असून कित्येक निराधार मुलांचे पालकत्व त्यांनी घेतले आहे. महाराष्ट्र राज्य किकबॉक्सिंग असोसिएशनचे चेअरमन म्हणूनही ते जबाबदारी संभाळत आहेत. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ते दिनदुबळ्यांची नेहमीच सेवा करत असतात. गोरगरिबांना मदत करणारे आणि गरजू लोकांच्या हाकेला धावून जाणारे कर्मयोगी व्यक्तिमत्व म्हणून डॉ. संतोष बारणे परिचित आहेत.

Share this: