श्री शिवाजी साहुजी बोबडे दि ३१ मे २०२० रोजी सेवानिवृत्त होताहेत; त्यानिमित्ताने
शंकर विद्यालय राहाटी (बु) ता जि नांदेड चे सेवक श्री शिवाजी साहुजी बोबडे हे नियत वयोमानानुसार दि ३१ मे २०२० रोजी सेवानिवृत्त होताहेत; त्यानिमित्ताने शाळेच्या वतीने दि ३१मे २०२० रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता त्यांना निरोप देण्यात येणार असून “सपत्नीक ” सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष केशवराव बोकारे, सचिव मा.हा.लांडगे गुरुजी, शाळेचे मु.अ. आर.डी. कांबळे व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
नवयुगाच्या वाटेवरील एक स्तंभ अशी ओळख असणारे, सर्वांच्या मनामध्ये एक शृंखला निर्माण करणारे सेवक शिवाजी बोबडे आज २५ वर्षे सेवा करून आपल्या पावलांच्या ठश्यावर सहकाऱ्यांना कार्य करण्याची दिशा दाखवून सेवेला पूर्णविराम देवून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
शिवाजी बोबडे यांनी समाजाप्रती आपुलकी, विद्यार्थ्यांप्रती स्नेहभाव राखत त्यांच्याशी अतिशय प्रेमळपणाने नातेसंबंध जपले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या मुलाला समाजाची सेवा करण्यासाठी शिक्षण प्रक्रियेमध्ये आणून शिक्षक म्हणून घडविले.कारण शिक्षक हा नवसमाजाचा एक घटक असतो. यामुळे आपला मुलगा शिक्षक बनवून शिवाजी बोबडे यांनी आदर्श निर्माण केला आहे.
शाळेचा परिसर तसेच विद्यार्थी वर्ग आणि शाळेतील कर्मचारी सदैव आपल्या सेवेची उजळणी गिरवत राहतील.अशी आशा बाळगण्यास काही हरकत नाही.
श्री शिवाजीराव बोबडे यांना भावी आयुष्यात सुख, शांती, समाधान लाभो!!
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो
हीच मनोकामना व हार्दिक -हार्दिक शुभेच्छा