पिंपरी-चिंचवड शहरातील मटका अड्ड्याचे वास्तव ;लाखोंचा हफ्ता घेऊन पोलिस करताहेत दुर्लक्ष

दिपक साबळे..!

पिंपरी(वास्तव संघर्ष) ; पिंपरी-चिंचवड शहरात पोलीसांच्या आशिर्वादाने अनेक ठिकाणी मटका अड्डा पुन्हा सुरू झाले आहे काल याबाबत वास्तव संघर्षने स्टिंग ऑपरेशन करून शहरात सुरू असलेल्या आवैद्य धंद्याचा पर्दाफाश केल्याने शहरातील अनेक महीला भगिनींनी वास्तव संघर्षकडे कारवाईची मागणी केली दरम्यान मागच्या आठवड्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर माई ढोरे, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी नालेसफाई पाहणीचा दौऱ्यात केला त्यावेळी देखील धक्कादायक वास्तव समोर आले होते. कोरोना संकट काळातही शहरात मटक्याचे अड्डे खुलेआम सुरू आहे. त्या ठिकाणी होणा-या गर्दीमुळे कोरोनाचे रूग्ण वाढण्याची दाट शक्यता असल्याचा प्रत्यय स्टिंग ऑपरेशन दरम्यान समोर आला आहे.

शहरात निगडी, भोसरी, चिखली,दिघी,पिंपरी,वाकड भागात अनेक ठिकाणी अवैद्य जुगार, मटका अड्डा सुरू आहेत एकीकडे कोरोनाचे संकट असल्याने भाजी विक्रेत्यावर देखील कारवाई केली जाते. तर दुसरीकडे अवैद्य धंद्यांना पोलीसांचेच पाठबळ असल्याचे दिसुन येते. शहरातील सामान्य नागरिकांनी कोरोना योद्धा म्हणून पोलीसांचा सन्मान केला आणि दुसरीकडे पोलिसांच्या आशिर्वादानेच शहरात मटक्याचे अड्डे खुलेआमपणे सुरू असल्याचे वास्तव आहे. महिन्याला लाखोंचा हफ्ता घेऊन पोलिस या मटक्यांच्या अड्ड्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणारे हफ्ते घेऊन अवैध धंद्यांना बळ देत असल्याने सामान्यांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रत्येक भागात मटका, जुगार, सोरट यांसारखे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. कोरोनाच्या संकटात सुद्धा हे अवैध धंदे सुरू आहेत. त्याकडे पोलीस प्रशासनाकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गरीब नागरिकांना शोषित केले जात आहे. पोलिसांनी या अवैध धंद्यांना आळा घालणे गरजेचे आहे. परंतु, महिन्याला मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या हफ्त्यामुळे पोलिसांनी शहरातील अवैध धंद्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे.

आहे. मटक्यामुळे शहरातील अनेक गोरगरीब नागरिकांचे संसार उध्वस्त झाले असून मटक्यासाठी अनेक कुटुंबात कौटुंबिक कलह वाढत आहेत. हे असेच सुरु राहिले तर अनेक गोरगरीब कुटुंबे व शहरातील युवक यांमुळे बरबाद होण्याची भिती आहे. पोलीस यंत्रणेने या अवैध मटका धंद्याकडे वेळीच लक्ष घालून ते बंद करावेत आणि ते चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महीला, भगिनींनी वास्तव संघर्ष न्युजकडे केली आहे याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई काय कारवाई करणार यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share this: