माझं पिंपरी -चिंचवड

वास्तव संघर्ष बातमीचा ईपॅक्ट ;अखेर निगडीतील “डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत प्रवेशद्वार” चे काम प्रगतीपथावर

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत सेक्टर नं 22 येथे नव्याने निर्माण होणारी विश्वरत्न ” डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत प्रवेशद्वार” या कामास 2 वर्ष पूर्ण होत आहेत. अद्याप काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे गेली 2 वर्ष सदर भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता . एवढा काळ विलंब करण्याचे काहीएक कारण नव्हते. माञ हे काम जलदगतीने पूर्ण करावे यासाठी लढा युथ मुव्हमेंटने याबाबत आयुक्तांकडे निवेदन दिले होते. त्यानंतर वास्तव संघर्ष यासंदर्भात दखल घेऊन बातमी प्रसिद्ध केली.आज रोजी वास्तव संघर्ष बातमीचा ईपॅक्ट झाला असून निगडीतील “डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत प्रवेशद्वार” चे काम प्रगतीपथावर येत आहे.

या संदर्भात लढा युथ मुव्हमेंटचे अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर यांनी वास्तव संघर्षचे आभार मानले असून ते म्हणाले, निगडीतील “डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहतीच्या प्रवेशद्वारातून कोरोनात मृत्यूमुखी पडलेले शव स्मशानभूमीत आणले जाते. मात्र प्रवेशद्वाराचे काम रखडल्यामुळे येथे येणारे शव ज्या ठिकाणी प्रवेशद्वाराचे काम चालू आहे. त्यामुळे शववाहिकाना स्मशानभूमित जाण्यासाठी नागरी वस्तीतून व वर्दळीच्या मार्गाने जाण्यास भाग पडत होते . त्यामुळे या भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता . हे काम त्वरित पूर्ण करावे यासाठी लढा युथ मुव्हमेंट पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले होते. याची दखल आज वास्तव संघर्ष ने घेऊन बातमी प्रसिद्ध केली त्यामुळे प्रवेशद्वाराचे काम आता प्रगतीपथावर आहे.

दरम्यान यासाठी लढा यूथ मूव्हमेंट चेअध्यक्ष प्रमोद क्षिरसागर , अमित गोरे, बुद्धभूषण अहिरे, भैय्यासाहेब ठोकळ, पंकज धेंडे, सिद्धार्थ मोरे, गौतम कांबळे यांनी मौलाचे सहकार्य केले.

Share this: