बातम्या

पिंपरीतील भाटनगर येथे अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरीतील भाटनगर येथील दोस्ती चायनीज येथे गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना पिंपरी पोलीसांनी अटक केली आहे . त्यांच्याकडून 42 हजार 900 रुपये किमतीचा एक किलो 716 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे . ही कारवाई पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केली .

पिंपरी पोलीस स्टेशनचे बाळासाहेब सूर्यवंशी यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

प्रशांत विजय तामचीकर ( वय 46 ) , अशोक दगडू सकट ( वय 45 , दोघेही रा . भाटनगर , पिंपरी ) , असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी प्रशांत आणि आरोपी अशोक आरोपी यांनी अवैधरित्या गांजा विक्री करतानाची माहिती पिंपरी चिंचवड पोलीस दलातील अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली . त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून दोघा आरोपींना ताब्यात घेतले . आरोपींकडून 42 हजार 900 रुपये किमतीचा एक किलो 716 ग्रॅम गांजा जप्त केला . या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली . अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Share this: