क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

‘त्या’ मोबाईल चोरांना पोलिसांनी वेषांतर आणि सापळा रचून केली अटक

चाकण (वास्तव संघर्ष) :कुरुळी फाटा परीसरामध्ये अनोळखी पाच दरोडेखोरांनी रस्त्याने चालणाऱ्या तरुणाला अडवून कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडून 38 हजारांचे दोन मोबाईल फोन दरोडा घालून चोरून नेल्याचा प्रकार नुकताच चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता . या गुन्ह्यातील आणि चार जबरी चोरीच्या गुन्ह्यातील तिघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीन आणि म्हाळुगे पोलिसांनी वेषांतर आणि सापळा रचून अटक केली.

विष्णु आनंदा नरवाडे ( वय 21 , मूळ रा . मरकळ रोड , आळंदी . सध्या रा . कुरुळी , ता.खेड , जि . पुणे ) , कृष्णा बाळासाहेब सोनवणे ( वय 20 , रा . कुरुळी , ता.खेड , जि . पुणे ) , आकाश कैलास ठोसर ( वय 20 , रा . कुरुळी , ता . खेड , जि . पुणे ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , 30 जून रोजी कुरुळी फाटा परीसरामध्ये अनोळखी पाच दरोडेखोरांनी रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तीला अडवून त्याचे 38 हजारांचे दोन मोबाईल फोन चोरून नेले . या गुन्ह्याचा समांतर तपास म्हाळुगे पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट तिनचे पोलीस करत होते . या गुन्ह्यातील काही आरोपी आंबेठाण येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . त्यानुसार पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले . दरोड्याच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा मुख्य साथीदार विष्णू नरवाडे हा असून तो मित्रासह कुरळी फाटा येथे गुन्हयातील मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . त्यानुसार वेषांतर करून सापळा लावून पोलिसांनी तिघांना अटक केली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले . पोलिसांनी आरोपींकडून 14 मोबाईल फोन , एक कोयता असा एकूण 2 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . यामुळे दरोड्याचा एक आणि जबरी चोरीचे चार असे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत . आरोपी विष्णू नरवाडे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचे दोन गुन्हे दाखल होते गुन्हे घडल्यापासून तो फरार होता .अधिक तपास म्हाळुगे पोलीस करीत आहेत .

Share this: