आरोग्यबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

बिलाअभावी कोरोना मृतदेह अंत्यविधीसाठी आदित्य बिर्ला हॉस्पीटलने दिला नकार;आंदोलनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात

वाकड (वास्तव संघर्ष) : थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालय नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडत असते कधी या रूग्णालयात रूग्णांना पैशाअभावी खोलीत डांबून ठेवले जाते तर कधी बिल न भरल्यामुळे रूग्णांवर व्यवस्थित उपचार केले जात नाही. आता तर या हाॅस्पिटलने हद्दतच केली आहे या हास्पिटलमध्ये कोरोना या संसर्गजन्य रोगावर उपचार घेत असलेल्या रुग्णाचा शनिवारी ( ता . ३ ) मृत्यू झाला . सव्वा पाच लाख रुपये बिल भरण्यासाठी मृतदेह अंत्यविधीसाठी देण्यास रुग्णालयाने नकार दिला . अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेत येथे ठिय्या आंदोलन केल्याने उर्वरित बिल माफ करीत मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला .

आशिष सिद्धार्थ कांबळे(वय-34 राहणार – भाटनगर पिंपरी) असे मृत व्यक्तिचे नाव आहे . त्याचे शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले .

दाखल होताना पन्नास हजार अनामत रक्कम भरली आणि त्याच्याकडे दोन लाखांचा विमा होता , हे माहीत असूनही रुग्णालयाने पाच लाखांच्या पुढे बिल काढले , असा आरोप नातेवाइकांनी केला आहे . बिल भरणार नाही , तोपर्यंत मृतदेह देणार नाही , असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले . रफिक कुरेशी , राहुल ओव्हाळ , हरिश डोळस , अजीज शेख , दीपक कांबळे युनूस पठाण , माऊली बोराटे , राम बनसोडे , अरविंद जावळे , नंदकुमार शिंदे यांनी बिल माफ करून मृतदेह ताब्यात देण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले , अखेर वाकड पोलिसांच्या मध्यस्थीने रुग्णालयाने अडीच लाख रुपये बिल माफ करीत सायंकाळी मृतदेह अंत्यविधीसाठी दिला .दरम्यान आदित्य बिर्ला हॉस्पीटल हे वारंवार अशा प्रकारे गरिब रूग्णांची बिलाअभावी हेळसांड करत आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून आदित्य बिर्ला हॉस्पीटलच्या प्रशासनावर अंकुश ठेवावा असे सामाजिक कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले.

Share this: