पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एका पोलिसावर हल्ला ;नोकरी घालवण्याची दिली धमकी
पिंपरी (वास्तव संघर्ष ): पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांवर हल्ले होण्याचे सत्र सुरु झाले आहे. गुरुवारी(दि.29) सायंकाळी एका पोलिसाला दमदाटी, धक्काबुक्की आणि अश्लील शिवागाळ केल्याचा प्रकार घडला होता. आज शुक्रवार (दि.30)रोजी आणखी एका पोलिसावर हल्ला झाला आहे. ही घटना लालटोपीनगर मोरवाडी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे.
पिंपरी पोलीस स्टेशनचे पंडित लक्ष्मणराव धुळगंडे यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रामदास सोपान लुकर (वय-65 ,रा.लुकर चाळ लालटोपीनगर मोरवाडी ), सतीश पवार(वय-40 ,रा. लालटोपीनगर मोरवाडी ), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी तीनच्या दरम्यान मोरवाडी येथे फिर्यादि पंडित धुळगंडे हे विना मास्क असणाऱ्या नागरिकावर कार्यवाही करित होते. इतक्यात आरोपी रामदास लुकर हा मास्क न लावता फिर्यादी पंडित धुळगंडे यांच्याकडील दंडाची पावती अश्लील शिवागाळ करत हिसकावुन घेतली. त्यावेळी आरोपी रामदास लुकर, आरोपी सतीश याने थेट पोलीसांच्या अंगावर धावून जात तीथे पडलेल्या लाकडी पोकळ दांडक्याने फिर्यादी पंडित धुळगंडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात त्यांच्या डोळ्याच्या वर कपाळावर गंभीर दुखापत झाली आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.