क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

भाजप नगरसेविका आशा शेंडगेंसह दहा ते बारा जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या नामफलकावर शाई फेकल्यामुळे पिंपरी पोलीसांनी भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांच्यासह दहा ते बारा जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी दिडच्या सुमारास पालिकेच्या चौथ्या मजल्यावर घडली आहे. याबाबत पिंपरी पोलीसांनी नगरसेविका शेंडगे सह दहा जणांना अटक केली आहे.

प्रमोद रामकृष्ण निकम यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आशा तानाजी धायगुडे / शेंडगे त्यांचे समर्थक महिला, पुजा अरविंद भंडारी (वय अंदाजे-25 वर्ष ) शितल पंकज पिसाळ (वय अंदाजे-21 वर्ष ) गौरी कमलाकर राजपाल( वय अंदाजे-31 वर्ष ) आशा जैसवाल (वय अंदाजे-40 वर्ष), शितल महेश जाधव ,( वय अंदाजे – 36 वर्ष , ) जयश्री रामलिंग सनके ,( वय अंदाजे – 33) संध्या रमेश गवळी , (वय अंदाजे-47 वर्ष ) स्वप्निल भारत आहेर , (वय-21 वर्षे , संजय शंकर पवार , संजय शेंडगे(वय अंदाजे-45 वर्ष सर्व रा . कासारवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशा शेंडगे यांनी त्यांच्या मागण्याकरिता परवानगी घेवुन मर्यादीत लोकांसह कोविड अनुषंगाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करुन लोकशाही मार्गाने आंदोलन करणे आवश्यक असतांना अंगावर शाई टाकन्याचे उद्देशाने आपसांत कट रचुन शासकिय अधिकारी अशोक मारुती भालकर यांचे दालनात जावुन ते बसतात त्या खुर्चीवर फुले व काळी शाई टाकुन तसेच टेबलावर काळया शाईने “ धिक्कार ” अशी अक्षरे लिहून तसेच आयुक्त राजेश पाटील यांच्या दालनाबाहेर बेकायदेशिर जमाव जमवला.

तसेच मा.आयुक्तांना व्हिडिओ कॉन्फरन्सिग करिता दालनातुन बाहेर पडण्यास अटकाव करुन सुरक्षा रक्षक तसेच पोलीस अंमलदार यांना धक्काबुक्की करुन मा.आयुक्तांच्या भिंतीवरील नामफलकावर काळया शाईचे शाई ग्लासमध्ये ओतुन फेकली व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मोठमोठयाने घोषणाबाजी करुन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दैनंदीन शासकिय कामात अडथळा निर्माण केला . भाजप नगरसेविका आशा शेंडगेंसह दहा ते बारा जणांना पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक पालांडे अधिक तपास करीत आहेत.

Share this: