क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

धक्कादायक : पाच वर्षीय चिमुडीवर 67 वर्षीय नराधमाने केला लैंगिक अत्याचार

दिघी (वास्तव संघर्ष) : एका पाच वर्षीय चिमुडीवर 67 वर्षीय नराधमाने  लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . ही घटना 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वापाच ते सहा वाजताच्या कालावधीत दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

याबाबत पीडित मुलीच्या आईने  दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शशिकांत आबासाहेब तापकीर ( वय 67 ) असे ताब्यात घेतलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपीने पीडित पाच वर्षीय मुलीला त्याच्या दुचाकीवरून घराजवळ असलेल्या पेरूच्या बागेतील गोठ्यात नेले .तिथे जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक संबंध केले . पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत .

Share this: