क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

दिवसाढवळ्या मामाचा खून करण्याचा भाच्यानेच रचला प्लॅन ;पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) : आपल्या मामाला ठार मारण्यासाठी  साथीदारांसोबत पिस्तूल घेऊन आलेल्या भाच्यावर पिंपरी पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना पिंपरीतील डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळयाच्या पाठीमागील आत्मानगर सोसायटीच्या गेटच्या समोर रविवार (दि – 07) रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

देवेंद्र लक्ष्मण कांबळे (वय-42 रा. गणपती मंदीराजवळ , गांधीनगर झोपडपट्टी , पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संतोष भास्कर नागोजे , गोपाल , सोन्या व मिठ्या चव्हाण  ( पुर्ण नाव पत्ता माहिती नाही ) या आरोपीं विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्याचा मित्र राजेश  गंजे  असे दोघे डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळयाच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात रिक्षामध्ये बसून गप्पा मारत असताना , फिर्यादी याचा भाचा  संतोष भास्कर नागोज  व त्याचा मित्र गोपाल हे दोघे त्यांच्याकडील निळ्या रंगाच्या गाडीवर येऊन फिर्यादी यांच्या रिक्षात डोकावून पाहून डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळयाच्या पाठीमागील आत्मानगर सोसायटीच्या गेटच्या समोर जाऊन उभे राहिले. त्यावेळी फिर्यादी हे त्या दोघांना पाहण्यासाठी सोसायटीच्या गेटच्या समोर गेले असता , फिर्यादी यांचा भाचा याने कोणाला तरी हात करुन बोलावून घेतले. म्हणून फिर्यादी यांना संशय आल्याने ते आत्मानगर सोसायटीच्या गेट मधून सोसायटीमध्ये घुसले , त्यावेळी फिर्यादी यांचा भाचा व त्याचा मित्र  गोपाल यांनी फिर्यादी यांना पकडुन सिमेंटच्या गट्टूने व लाथा बुक्यांनी मारहाण केली , त्यावेळी  सोन्या व मिठ्या चव्हाण हे दोघे तेथे आले व सोन्या याने त्याच्या हातातील लोखंडी कोयता फिर्यादी यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांच्या उजव्या पायाने सोन्या यास पाठीमागे ढकले , त्यावेळी फिर्यादी यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याजवळ जखम झाली.

आरोपी गोपाल याने फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या कंबरेला असलेला पिस्तुल बाहेर काढला , त्यावेळी फिर्यादी त्यांच्या तावडीतून सुटून आत्मानगर सोसायटी , बिल्डींग सी च्या पहिल्या मजल्यावर पळून गेले , तेथे फिर्यादी यांचा भाचा व त्याचे मित्र  गोपाल , सोन्या व मिठ्या चव्हाण यांनी संगणमत करुन फिर्यादी यांना सिमेंटच्या गट्टूने लोखंडी कोयत्याने व लाथा बुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला .अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share this: