बातम्या

‘फडणवीस चले जाव ‘म्हणत देवेंद्र फडणवीसांना दाखवले काळे झेंडे

भोसरी (वास्तव संघर्ष ): पिंपरी-चिंचवड महापालिकेने भोसरीत उभारलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनासाठी आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.6) काळे झेंडे दाखवले. तसेच फडणवीस “चले जाव ”च्या आणि दिवंगत अंकुशभाऊ लांडगे अमर रहेच्या घोषणा दिल्या.

पिंपरी चिंचवड महापालिकेने विविध ठिकाणी उभारलेल्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रविवारी शहरात आले होते. भोसरीमध्ये उभारलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचेही देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यासाठी ते येत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंड दाखवले.


गो बॅक गो बॅक देवेंद्र फडणवीस गो बॅक तसेच दिवंगत अंकुशभाऊ लांडगे अमर रहेच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.दिवंगत अंकुशराव लांडगे समर्थकांचा तीव्र रोष पाहता देवेंद्र फडणवीस उद्घाटनस्थळी जाणारा मार्ग बदलण्यात आला. ते बदललेल्या मार्गावरून कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी पोहोचले.

Share this: