कोणतेही झेंडे दाखवा आम्हाला फरक पडत नाही – देवेंद्र फडणवीस
पिंपरी (वास्तव संघर्ष) : सामान्य माणसाला श्वास घ्यायला जागा हवी आहे . ओपन स्पेस पाहिजे. जनता आपले काम बघत आहे . कुणी काळे , पिवळे , निळे कोणतेही झेंडे घेतले तरी काही फरक पडत नाही. ह्यांची दुकानं बंद झाली आहेत हे खरं आहे . भाजप सत्तेत आल्यानंतर झालेला विकास लोकांनी बघितला आहे , असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या विविध विकास कामांची सुरूवात फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी आमदार महेश लांडगे , महापौर माई ढोरे , उपमहापौर हिरानानी घुले , माजी खासदार अमर साबळे , सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके , अमित गोरखे , उमा खापरे , नगरसेवक एकनाथ पवार , सदाशिव खाडे , योगिता नागरगोजे , अनुराधा गोरखे , योगिता थोरात , राहुल जाधव , कुंदन गायकवाड , तुषार हिंगे , केशव घोळवे , राजू दुर्गे , उत्तम केंदळे , बाबू नायर , माऊली थोरात आदीउपस्थित होते.
एखादं चांगलं काम करा आणि श्रेय घ्या . पण विरोधकांना काम करायचंच नाही आणि श्रेय घ्यायचं आहे . ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो. विरोधकांनी निवडलेल्या आंदोलनासाठीच्या जागा चुकल्या. अण्णासाहेब पाटील पुतळा समोर , अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने असलेल्या उद्यानासमोर निदर्शने केली. अटलबिहारी वाजपेयी हे वैश्विक नेते होते . विरोधी पक्षात असतानाही त्यांनी भारताची बाजू यूएन मध्ये भक्कमपणे मांडली फडणवीस पुढे म्हणाले“ सध्याच्या राज्यातील सरकारला महाविकास आघाडी सरकार म्हणायचं की महावसुली सरकार म्हणायचं हा प्रश्न आहे.
पुणे , पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो सुरू झाली . याचे श्रेय घ्यायला अनेक लोक येतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे ही मेट्रो झाली आहे. आम्ही पाच वर्षे प्रामाणिकपणे काम केलं आहे. आता हे वॉर्ड बदल वैगेरे करत आहेत .तुम्ही काय करायचं ते करा जनता बघतेय. आगामी निवडणुकीत आम्हीच जिंकू ” असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला .