बातम्या

झुंज संस्थेने केली दिव्यांग प्रशिक्षण केंद्राची उभारणी

आळंदी (वास्तव संघर्ष) : झुंज दिव्यांग संस्थेच्या दिव्यांग प्रशिक्षण केंद्राचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला या सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर नितीन आप्पा काळजे यांनी उद्घाटन केले.

झुंज दिव्यांग संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी मोबाईल रिपेरिग प्रशिक्षण,मेणबत्ती व अगरबत्ती प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, सलून प्रशिक्षण,करियर विषयी मार्गदर्शन अशा स्तुत्य उपक्रम संस्थेच्या वतीने राबवले जाणार आहेत.

यावेळी कीर्तनकार ह. भ. प. नारायण महाराज यमगर, नगरसेविका विनयाताई तापकीर,सद्गुरु सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन म्हसे, सामाजिक कार्यकर्ते कांता राठोड,ज्येष्ठ अभिनेते सुरेश भाऊ डोळस,इंद्रायणी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल नारायण शिंदे,दिव्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष इंद्रजित भोसले , सगर काबरा, दिनेश कुऱ्हाडे, दादासाहेब करांडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रामुख्याने उपस्थिती लावली.

कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे, महिला अध्यक्ष नूतन रोहमारे, कार्याध्यक्ष राजेश दिवटे,ओममलंग घोणे, सुधीर माने यांनी केले.

Share this: