महापौर पदाचा कार्यकाळ संपल्यावर माई ढोरे स्कूटीवर बसून घरी रवाना
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ आज रविवार (दि. 13 ) रोजी समाप्त झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी सरकारी वाहने जमा केली. महापौर माई ढोरे यांनी महापालिका मुख्यालयात येऊन सरकारी वाहन जमा केले.त्यानंतर माई ढोरे या आपले पुत्र जवाहर ढोरे यांच्या स्कूटीवर बसून घरी रवाना झाल्या .
13 मार्च 2022 रोजी महापौरांचा कार्यकाळ संपला त्यामुळे महापालिकेतील पदाधिका-यांना सरकारी वाहने जमा करणे बंधनकारक आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या दिमतीला सरकारी वाहने असतात. या पदाधिका-यांनी सरकारी वाहने जमा केली.
आज महापौर उषा उर्फ माई ढोरे महापालिका मुख्यालयात दाखल झाल्या . त्यांनी आपल्या वापरातील सरकारी वाहन जमा केले. त्यानंतर त्या स्कूटीवर बसून घरी रवाना झाल्या.