क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

अखेर ‘त्या’ खूनाचा झाला उलगडा

पिंपरी (वास्तव संघर्ष) : स्वस्तात सोने देतो म्हणून आर्थिक फसवणूक केली याचा राग धरुन एकाचा खून करण्यात आला होता.या खूनाचा उलगडा शिरगाव पारंदवाडी पोलिसांनी व पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा पाच पोलीसांनी केला असून याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केले आहे.

समाधान तारासिंग पवार असे मयत तरुणाचे नाव आहे.

समीर शहाबुद्दीन शेख (वय 37 रा. चिंचवड), सागर दयानंद पिल्ले (वय 32 रा.चिंचवड),सुरज दयानंद पिल्ले (वय 32 रा. चिंचवड) व रविकुमार अरविंद राठोड (वय 31 रा. मारुंजी), नितीन लक्ष्मण पवार (वय 19 रा.मुळशी), अजित प्रभुराम ध्रुव (वय22 रा.मुळशी) हिलालाल उर्फ मंका मोटे (वय 30 रा. चिखली) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,6 सप्टेंबर रोजी एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. मात्र मयताची ओळख पटली नव्हती. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर 9 सप्टेंबर रोजी मयताची ओळख पटली.दरम्यान स्थानिक पोलीस व गुन्हे शाखा यांनी केलेल्या तांत्रीक तपासातून पोलिसांनी  समीर,सागर,सुरज यांना चिंचवड येथून ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी मयत समाधान याने त्याच्या इतर साथीदरांसह आरोपींना स्वस्तात सोने देतो म्हणून त्यांची आर्थिक फसवणूक केली होती. याचा राग आरोपींच्या मनात होता याच रागातून त्यांनी समाधानचा खून केल्याचे कबुल केले. याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा पाच यांनी आरोपी रविकुमार, नितीन, अजित यांना लेबर कॅम्पच्या 11 व्या मजल्यावरून शिताफीने अटक केले. तर हिरालाल यालाही पुढे अटक करत पोलीस ठाण्यात हजर केले.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे , अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे,पोलीस उप आयुक्त गुन्हे  काकासाहेब डोळे , पोलीस उपआयुक्त परिमंडळ-2 आनंद भोईटे , सहा.पोलीस आयुक्त , देहुरोड विभाग पदमाकर घनवट , सहा.पोलीस आयुक्त गुन्हे प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली व.पो.नि. वनिता धुमाळ , गुन्हे प्रकटीकरण विभागाचे स.पो.नि. उध्दव खाडे , पो.उप.नि. संतोष येडे , स.फौ. नंदकुमार चव्हाण , पो.हवालदार तुकाराम साबळे , पो.हवा  प्रशांत भोसले , पो.हवा.सुधीर वाडीले , पो.ना. /  समिर घाडगे , पो.ना. योगेश नागरगोजे , पो.कॉ  समाधान फडतरे तसेच गुन्हे शाखा युनिट ५ चे व.पो.नि. श्री . मनोज खंडाळे , पो.उप.नि. राहुल कोळी , सहा फौज , किरनाळे , पो . हवा  बनसुडे , पो.हवा  बहिरट , पो.हवा . ठाकरे , पो.ना. /  मालुसरे , पो.ना. शेख , पो . कॉ ईघारे , पो.कॉ.  खेडकर , पो.कॉ.  गाडेकर , पो.कॉ.  गुटटे तसेच तांत्रीक विश्लेषन विभागाचे पो.उप.नि. रमेश पवार , पो . हवा , माळी , पो ना पंडित , पो कॉ हुलगे यांनी केली आहे .

Share this: