बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे अडचणीत; उमेदवारी रद्द होण्याच्या मार्गावर

चिंचवड (वास्तव संघर्ष):205 चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारांची शपथपत्रांची पाहणी केली असता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे यांनी शैक्षणिक अर्हता बाबत खोटी माहिती देऊन निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे. माहिती संभ्रम निर्माण करणारे आहे.2014 च्या 205 चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात सादर केलेली शैक्षणिक अर्हता अकरावी पास असे दाखवले आहे 2017 च्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेवक निवडणुकीच्या शपथपत्रात 10 वी पास असे शैक्षणिक अर्हता दाखवली आहे.यावेळी 2023 च्या 205 चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या शपथपत्रात शैक्षणिक अर्हता 11 वी (नापास )अनुत्तीर्ण दाखविली आहे. 2014 च्या व 2023 च्या निवडणुकीत शैक्षणिक अर्हता बाबत संभ्रम निर्माण करणारी माहिती दिली आहे ही माहिती खोटी आहे.

त्यामुळे नाना काटे यांची उमेदवारी रद्द करा अशी तक्रार अपेक्ष उमेदवार राजू उर्फ रविराज बबन काळे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे केली आहे.सदरील तक्रारीत काळेयांनी म्हटले आहे की, 2014 च्या चिंचवड विधानसभा निवडणुकीत उच्चतम शैक्षणिक अर्हता 11 वी पास असे दाखवले आहे. पाठ्यक्रम पूर्ण केल्याचे वर्ष 1992 -1993 असे दाखवले होते आता 2023 मध्ये 205 चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उच्चतम शैक्षणिक अर्हता 11वी अनुत्तीर्ण व पाठ्यक्रम पूर्ण केल्याचे वर्ष 1992- 1993 असे दाखवले आहे आणि 2017 च्या नगरसेवक निवडणुकीत 10 वी पास अशी शैक्षणिक अर्हता दाखवण्यात आली होती प्रत्येकवेळी निवडणुकी शपथपत्रात शैक्षणिक अर्हता वेगवेगळे दाखवण्यात आली आहे ती खोटी आहे. साल 1992- 93 यावर्षी अकरावी उत्तीर्ण झाले आणि अनुत्तीर्ण झाले आहेत.

 विठ्ठल नाना काटे यांनी शैक्षणिक अर्हता बाबत खोटी माहिती शपथपत्र मध्ये सादर केली आहे.सदर प्रकाराची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत सुरू असलेल्या 205 चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमधील विठ्ठल नाना कृष्णाजी काटे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांची उमेदवारी रद्द करून संपूर्ण पोटनिवडणूक प्रक्रियेतून वगळून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात यावी. खोटे शपथ पत्र सादर केल्या प्रकरणी निवडणूक आयोगामार्फत गंभीर दखल घेत गुन्हे दाखल करण्यात यावे.विठ्ठल नाना काटे यांची शैक्षणिक अर्हता 10 वी, 11 वी पास /नापास पडताळून घेण्यासाठी तत्काळ कागदपत्र सादर करण्यास विठ्ठल (नाना) काटे यांना आदेश देण्यात यावे.

 विठ्ठल नाना कृष्णाजी काटे यांना प्रचार करण्यापासून रोखण्यात यावे व पुढील प्रचाराच्या सर्व परवानगी रद्द करण्यात यावी.सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी तात्काळ कारवाई करावी यासाठी तक्रार केली आहे तक्रारीची तात्काळ दखल न घेतल्यास योग्य ती कायदेशीर कृती असा इशारा अपक्ष उमेदवार राजू उर्फ रविराज बबन काळे यांनी दिला

Share this: