चिंचवड पोटनिवडणूक: मुस्लिम समाजाची मते कोणाची जहागिरी नाही ? सिद्दीक शेख
पिंपरी (वास्तव संघर्ष): सध्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे वारे आहेत. त्यामुळे पक्ष आणि इतर अपक्ष उमेदवार आप आपल्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यातच सर्व जाती धर्माच्या लोकांविषयी उमेदवार आप आपली भुमीका स्पष्ट करताना दिसत आहेत.याबाबत अपक्ष उमेदवार सिद्दिक शेख यांनी प्रसिद्धपत्रक काढून आपली भुमीका स्पष्ट केली आहे ते म्हणतात, आज पर्यंत सिद्दिक शेख यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले आहे.त्यामुळे सर्व समाजातील नागरिकांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे.या निवडणुकीत पहिल्यांदाच धनदांडग्या विरोधात लढताना आज स्टम्प पेपर वर मतदार संघातील सर्व मुद्यांवर जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.त्यामुळे इतर उमेदवारांची गोची झाली आहे.
सर्व राजकीय पक्षांनी सिद्दिक शेख यांची धास्ती घेतल्याने कधीही मुस्लिमांकडे न फिरकणारे चिचंवड विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम मेळावे घेत आहेत. प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांना मुस्लिमांची मते हवी असतात .परंतु मुस्लिमांच्या प्रश्नांविषयी जाहीरपणे बोलण्याशी ते नेते कचरतात .आणि पुन्हा तीच आश्वासने देत आहेत. पिंपरी चिचंवड शहरामध्ये मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न आहेत. सांस्कृतिक भवन , उर्दू शाळा , कब्रस्तान , वक्फ च्या जमिनी इत्यादी प्रमुख प्रश्न आहेत. सुरक्षितता हा सुद्धा अत्यंत महत्वाचा विषय झालेला आहे. कारण अलीकडील काही महिन्यामध्ये क्षुल्ल्क कारणांवरून गोर गरीब मजुरी करणाऱ्या मुस्लिमाना लक्ष्य केले जात आहे. त्यावेळी याच तथाकथित पक्षाचे लोक गुन्हेगारांना वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनला फोन करतात . चिचंवड मतदार संघातील काळेवाडी , थेरगाव , डांगेचौक , गुजरनगर , वाकड , रहाटणी , कस्पटे वस्ती या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम लोकसंख्या आहे. याबाबत मुस्लिम समाज मागील २५ वर्षे केवळ कब्रस्तानच्या मागणीसाठी या सर्व नेत्यांच्या दरामध्ये हेलपाटे मारत आहे. परंतु या नेत्यांची मानसिकताच दिसत नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाने सर्व मस्जिदींना एकत्रित करून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह सध्याचे राष्टवादीचे उमेदवार नाना काटे , अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची भेट घेऊन कब्रस्तानचा प्रश्न लावण्याची विंनती केली होती. परंतु यातील एकानेही या विषयाला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे सर्व समाजाच्या वतीने सिद्दीकभाई शेख यांनी कब्रस्तान संघर्ष समिती बनवून कब्रस्तानसाठी मोठा लढा उभा केला .पालिकेच्या विरोधात मोठे आंदोलन केले प्रशासनाला लेखी आश्वासन देण्यास भाग पाडले .परंतु त्यावेळी सुद्धा अजित पवार नाना काटे असोत किंवा राहुल कलाटे हे सर्व नेते आंदोलनकडे फिरकले सुद्धा नाहीत.राहुल कलाटे व नाना काटे यांनी मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानसाठी एखादे पत्र दिले असेल तर जाहीर करावे.
सर्वच राजकीय पक्षाचे नेते फक्त मतांपुरता मुस्लिम समाजच्या मतांचा वापर करतात हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते शहरात येतात स्वर्गीय दत्ता काका साने यांच्या सांत्वन करण्यासाठी घरी भेट देता. स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या घरी भेट देतात.पण हेच राष्टवादीचे मोठे नेते अनेकवेळा पिंपरी चिचंवड मध्ये येऊनसुद्धा स्वर्गीय नगरसेवक जावेद शेख यांच्या घरी जात नाहीत .128नागरसेवकांपैकी आज 1 हि मुस्लिम नगरसेवक नाही .त्यामुळे मुस्लिम समाजाला माझे आव्हान आहे कि,आपली लढाई कुठल्याही राजकीय पक्षाशी नाही , किंवा व्यक्तीशी नाही . परंतु मुस्लिम समाजाला बेदखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा या शहराचा घटक आहोत.
आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सुद्धा लढाई लढू शकतो आणि आमचे अस्तित्व सिद्ध करू शकतो हे दाखवण्यासाठी मी लढाई लढत आहे. शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा घेऊन सर्वांसाठी काम करीत असताना मुस्लिम समाजाच्या सामाजिक ,शैक्षणिक ,आर्थिक ,सांस्कृतिक विकासासाठी प्रयत्न करणे हे सुद्धा माझे कर्तव्य आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कसल्याही अमिषाला , भूलथापांना बळी न पडत फक्त आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी एकत्रित येऊन कार्यक्षम अपक्ष उमेदवार सिद्दीकभाई शेख यांच्या नंबर समोरील सफरचंद या चिन्हा समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा असे देखील ते म्हणाले.