महाराष्ट्रातील पहिले मनिपुरंम ज्वेलरी शोरूम पिंपरी चिंचवडमध्ये
पिंपरी (वास्तव संघर्ष): पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्रातील एकमेव मनिपुरंम ज्वेलरी शोरूमचे उद्घाटन आज रोजी करण्यात आले आहे. आपले स्थान अधिक भक्कम करीत सर्वांत विश्वासार्ह ज्वेलरी ब्रॅंड असलेल्या मनिपुरंम ज्वेलर्सन पिंपळेसौदागर कोकणे चौक येथे आपले नवीन स्टोअर सुरू केले आहे.
या वेळी मनिपुरंम ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आदी मान्यवर उपस्थित होते. या नवीन स्टोअर्समध्ये मनिपुरंम ज्वेलर्सचे खास साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रातील मंगळसुत्रांची विविध कलेक्शन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच सिग्नेचर सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. पिंपळेसौदागर मधील स्टोअर रिलायन्स माॅलजवळ कोकणे चौक येथे सुरू करण्यात आले आहे.
व्यवस्थापकीय संचालक यावेळी म्हणाले, ‘‘पुण्याचा विस्तार चहूबाजूने होत असून, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणांवरून उपनगरांमधील अंतर वाढत चालले आहे. त्यामुळेच ग्राहकांनी प्रवास करून मध्यवर्ती ठिकाणी येण्यापेक्षा जिथे ग्राहक आहेत, तिथेच आम्ही विस्तार करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत प्रथम पिंपरी चिंचवडचा समावेश होत आहे, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रातील पहिले मनिपुरंम ज्वेलरी शोरूमचे उद्घाटन केले आहे.