बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

राजीव गांधी यांच्यामुळे भारताची संगणक क्षेत्रात प्रगती : सचिन साठे

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला.

पिंपरी (वास्तव संघर्ष ) : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत. परदेशात स्थायिक झालेले अनेक भारतीय शास्त्रज्ञ, संशोधक, उद्योजक भारतात परत आले. त्यावेळी या शास्त्रज्ञांना सरकारने देशात पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. राजीव गांधी यांच्या प्रयत्नांमुळेच देशात दळणवळण व संगणक क्षेत्र वेगाने विकसित झाले. आज भारत देश म्हणजे मोबाईल व संगणकाची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून विकसित झाली आहे. याचे सर्व श्रेय राजीव गांधी यांचे आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्राधिकरण निगडी येथे सचिन साठे यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 21) राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी सद्‌भावना दिनानिमित्त दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. सेवादलाचे राष्ट्रीय सचिव संग्राम तावडे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जैसवाल, असंघटीत कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, ज्येष्ठ नागरिक सेलचे लक्ष्मण रुपनर, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष किशोर कळसकर, एनएसयूआयचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, भास्कर नारखेडे, निर्मल तिवारी, शेख महेताब इनामदार, अनिरुध्द कांबळे, हिरामण खवळे, चंद्रशेखर जाधव, दिलीप पांढरकर, विश्वनाथ खंडाळे, दीपक जाधव, अलका काळे, शितल कोतवाल, संतोष पांडे, विठ्ठल कळसे, बाबासाहेब बनसोडे, विष्णू खरे, महेंद्र शितोळे, तानाजी काटे, अजय खराडे, संदेश नवले, तुकाराम भोंडवे, तुषार पाटील, हरीदास नायर, वासिम शेख, बाजीराव आल्हाट, बाळासाहेब जगताप, शशिकांत कांबळे, मकरध्वज यादव, गुंगा क्षिरसागर आदी उपस्थित होते.
साठे पुढे म्हणाले की, संगणक व दळणवळण क्षेत्रामुळे देशभर लाखो युवक युवतींना रोजगार मिळाला. देशाच्या जीडीपीमध्ये लक्षणीय वाढ झाली. देशाचा चहुबाजूने विकास व्हावा हे त्यावेळी राजीव गांधी यांचे धोरण होते. त्यामुळेच आज पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, तसेच पुण्यात मगरपट्टा, चंदननगर, कल्याणीनगर परिसरात हजारो आयटी कंपन्यांमध्ये देशभरातील लाखो युवकांना रोजगार मिळाला आहे. असेच आयटी क्षेत्र नवी दिल्ली, नॉयडा, गुडगाव, हैदराबाद, चेन्नई येथे देखील विकसित झाले आहे. संगणक व दळण वळण क्षेत्राचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शेती, शिक्षण, व्यापार, कामगार, रोजगार अशा सर्वच क्षेत्रांना उपयोग झाला आहे. मागील सत्तर वर्षांत कॉंग्रेसप्रणित सरकारने काहीच केले नाही, अशी मोघम टिका करणा-या भक्तांनी आपल्या चष्म्यावरील धूळ पुसून देशाच्या आर्थिक व औद्योगिक विकासाचा अभ्यास करावा असेही सचिन साठे म्हणाले.

Share this: