काका तुम्ही डोक्यावरची शेंडी ठेवाच ;महापौरांनी उडवली खिल्ली
पिंपरी(वास्तव संघर्ष) आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांना पाडल्याशिवाय मी माझी डोक्यावरची शेंडी काढणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केलेल्या वक्तव्यावर महापौर राहुल जाधव यांनी खिल्ली उडवली आहे.
यावेळी महापौर म्हणाले काका तुम्ही डोक्यावरची शेंडी ठेवाच आमचे दैवत आमदार महेशदादा यांना पाडण्याचे स्वप्न पाहणारे दत्ता साने हे सन २००९आणि २०१४ या विधानसभा निवडणुकीत देखील अशीच एक भीष्म प्रतिज्ञा केली होती. पण ‘गरजने वाले बरसते नही’ अशी उपमा नागरिकांनी सानें यांना लावली . त्यावेळी साने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र महेशदादा यांना समर्थन देऊन त्यांनी त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रवादी चे अधिकृत उमेदवार विलास लांडे ना हरवले. याही वेळेस काका महेशदादाच्या विरूद्ध उमेदवारी अर्ज भरणार नाहीत फक्त निवडणूकीत वातावरण निर्मीती करणे हा काकाचा स्वभाव आहे.
आमचे दैवत आमदार महेश लांडगे हे पुन्हा आमदार होणारच कुणी कितीही डरकाळ्या फोटो काही फरक पडत नाही ही काळ्या दगडाची पांढरी रेष आहे असेही महापौर राहुलदादा जाधव म्हणाले.