बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रविण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांनी भरला वंचीतचा उमेदवारी अर्ज

जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रविण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांनी भरला वंचीतचा उमेदवारी अर्ज

पिंपरी (वास्तव संघर्ष ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघात वंचीत बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रविण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांनी आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी बाळासाहेब गायकवाड यांनी पिंपरीमधून जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

पिंपरी येथून हेडगेवार भवन आकुर्डी येथे असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा विजय असो या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

Share this: