दिपकभाऊ निकाळजे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
अमित मेश्राम यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए) च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड
पिंपरी(वास्तव संघर्ष ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या राष्ट्रीय कार्यकारिणी व केंद्रीय महासभा प्रतिनिधींची 10 नोव्हेंबर 2019 रोजी भोपाळ येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत 26 राज्यातील 200 हून जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्वांनुमते दिपकभाऊ निकाळजे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आणि महासचिव पदी डॉ. मोहनलाल पाटील निवड करण्यात आली. अशी माहिती पार्टीचे महासचिव डॉ. मोहनलाल पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथे दिली.
शुक्रवारी (दि. 29 नोव्हेंबर) चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे, राष्ट्रीय संघटक सुनिल खांबे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमित मेश्राम, महाराष्ट्र कार्यालय प्रमुख बप्पा शिंदे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सिना अमित छाजेड आदी उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांनी सांगितले की, आमचा पक्ष देशातील 28 राज्य आणि 9 केंद्र शासित प्रदेशात कार्यरत आहे. पुढील दोन वर्षात देशातील चार ते पाच राज्यांमध्ये विधानसभा तसेच महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांनंतर 25 हून जास्त महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या आणि स्थानिक निवडणूका आहेत. सर्व राज्यात लोकसभा, विधानसभा व स्थानिक निवडणूकांमध्ये उमेदवार उभे करण्यासाठी पक्ष संघटना बांधणी करण्यात येत आहे. यामध्ये युवक व महिलांना संधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात होणा-या सर्व निवडणूकांमध्ये पक्षाचे उमेदवार उभे करण्यात येतील. निवडणूकांना सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्राचे नेतृत्व युवकांनी करावे अशी मागणी होती. अमित मेश्राम यांचे संघटन कौशल्य पाहून त्यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय संघटक पदावर सुनिल खांबे यांची निवड करण्यात आली आहे. आगामी काळात आघाडी किंवा युती बरोबर जावे की नाही, याबाबत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करुन निर्णय घेऊ असे निकाळजे यांनी सांगितले.
पार्टीचे महासचिव डॉ. मोहनलाल पाटील यांनी सांगितले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) या राष्ट्रीय पक्षाची स्थापना 27/07/1990 रोजी भारत निवडणूक आयोगाकडे (क्र.56/6/90/1732/5303/35) करण्यात आली आहे. याबाबतची सर्व माहिती www.republicanpartyofindia.co.in या वेबसाईटवर आहे. पक्षाचे नोंदणीकृत केंद्रीय कार्यालय 1/16, संजय कॉम्प्लेक्स, टी टी नगर, मध्यप्रदेश भोपाळ 03 येथे आहे. 1990 पासून 2009 पर्यंत श्री एस.एस. भारती, श्री राजकुमार भारती, डॉ. मोहनलाल पाटील यांनी अध्यक्षपदावर आणि महासचिव पदावर श्री रामसिंग, श्री जंगेराम तँवर, श्री बी.के.गुप्ता यांनी काम पाहिले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे 2009 ते 2018 या कालावधीत या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. तर डॉ. मोहनलाल पाटील महासचिव होते. रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) या राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे आणि रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) नावाचा नविन पक्ष स्थापन केला आहे. याबाबतचे नोंदणी पत्र भारत निवडणूक आयोग यांच्या वतीने मुंबई जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी 19 मार्च 2019 (F. No.56/350/LET/ECI/FUN/PP/PPS-I/2018/11) प्रसिध्द केले आहे. (सोबत पत्र जोडले आहे.)
फोटो ओळ : अमित मेश्राम यांची आरपीआय (ए)च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी आरपीआय (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांनी मेश्राम यांचे अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रीय संघटक सुनिल खांबे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमित मेश्राम, महाराष्ट्र कार्यालय प्रमुख बप्पा शिंदे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सिना अमित छाजेड आदी
अधिक माहितीसाठी संपर्क : डॉ. मोहनलाल पाटील (राष्ट्रीय महासचिव) — 9303101085, अमित मेश्राम (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) — 9552555552