बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई बाळ यांचे निधन

पुणे (वास्तव संघर्ष) – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई बाळ यांचे वयाच्या ८४ वर्षी आज सकाळी दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले . स्त्री हक्क चळवळीतील लेखिका , महिलांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख होती .

१९८२ मध्ये दोन स्त्रियांचे खून झाले. त्यावेळी विद्या बाळ यांच्या ’नारी समता मंच’ या संघटनेने गावोगावी जाऊन वाहत्या रस्त्यांवर ‘मी एक मंजुश्री’ नावाचं प्रदर्शन भरवले होतं. या प्रदर्शनाने अख्खा महाराष्ट्रच ढवळून निघाला. स्त्रियांना बोलण्यासाठी काही जागा हवी. म्हणून मग विद्या बाळ यांच्या संघटनेने ‘बोलते व्हा’ नावाचे केंद्र सुरू केले. पुरुषांनाही याची गरज होती. त्यातून २००८ मध्ये ‘पुरुष संवाद केंद्र’ सुरू केले

पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली . त्यांच्या जाण्यानं महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळल्याची भावना व्यक्त होत आहे .

आज दुपारी त्यांचे पार्थिव प्रभात रोडवरील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे . त्यानंतर आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

Share this: