अपना वतनचा ” अन्नत्याग सत्याग्रह ” तात्पुरता स्थगित ;निवृत्त न्यायधीश बी. जी. कोळसे पाटील यांचे आश्वासन
पिंपरी (वास्तव संघर्ष) न्या. लोया यांच्या संशयित मृत्यूची फेरचौकशी करावी या मागणीसाठी अपना वतन संघटनेद्वारे पिंपरीतील विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अन्नत्याग सत्याग्रह करण्यात आला होता.
राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे , गृहमंत्री मा. अनिलजी देशमुख याना पत्रव्यवहार करण्यात आला होता . त्यास राज्यसरकारने प्रतिसाद न दिल्याने अपना वतन संघटनेच्या वतीने दि. ७ मार्च २०२० रोजी हे आंदोलन करण्यात आले होते . या आंदोलनास शहरातील ५० राजकीय व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता . आंदोलनाच्या २ ऱ्या दिवशी संध्याकाळी मुबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी भेट दिली. त्यावेळेस त्यांनी सांगतले कि, देशामध्ये सर्व लोकशाही व्यवस्थांवर सत्ताधारी पक्षाकाडून अप्रत्यक्षपणे हल्ले केले जात असून लोकशाही उध्वस्त करण्याचा घाट घातला जात आहे.
मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करून देशामध्ये अस्थिरता निर्माण करणायचा प्रयत्न सध्याचे केंद्रसरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळेस त्यांनी आंदोलनकर्त्याना न्या. लोया प्रकरणात स्वतः लक्ष घालून न्यायालयीन मार्गाने न्या. लोया प्रकरण तडीस नेहण्याचे आश्वासन दिले. व आंदोलनकर्त्याना आंदोलन थांबवण्याची विनंती केली. न्या. बी.जी. कोळसे पाटलांच्या विनंतीला मान देत शहरातील सर्व पाठिंबा देणाऱ्या संघटनांच्या संमतीने अपना वतनचे ” अन्नत्याग सत्याग्रह ” तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळेस न्या. बी.जी कोळसे पाटील यांच्या हस्ते संघटनेचे सिद्दीकभाई शेख व हमीद शेख याना लिंबू सरबत पाजून आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानवजी कांबळे , मारुती भापकर ,राहुल डंबाळे , ऍड मोहन अडसूळ ,ऍड किरण शिंदे ,ऍड सिकंदर शेख ,सौ .राजश्री शिरवळकर , सौ , संगीत शहा ,अनिता नायडू , प्रकाश पठारे , विशाल जाधव ,सुरेश गायकवाड ,सालार शेख , शहाबुद्दीन शेख ,रौफ शेख ,रशीद सय्यद , दीपक खैरनार ,फारुख शेख ,शिवशंकर उबाळे ,तौफिक पठाण ,मनोज मोरे ,जावेद सौदागर , दिलीप रणपिसे ,जमीर तांबोळी , संदीप साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.