“तू कुठेही जा स्वप्नाली मी तूला राहू देणार नाही “प्रेमभंगातून पुण्यात लावले तरुणाने पञक
पुणे (वास्तव संघर्ष) काही दिवसांपुर्वी ‘दादा मी प्रेग्नंट आहे”नावाचे प्लेक्स पुण्यात चौकात चौकात लावल्यानंतर तो कुणी लावला याची शोधमोहीम फत्ते केल्यानंतर आता पुण्यातील हडपसर येथे विजेच्या खांबावर आणि भिंतीवर लावलेली पञके आज(बुधवार) सकाळी दहाच्या सुमारास पोलिसांनी” स्वप्नाली तू कुठेही जा मी तुला सोडणार नाही “अशा आशयाचे पञके काढून टाकली आहेत.
याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. सूड भावनेतून केलेल्या या पत्रकात आकाश, स्वप्नाली आणि शैलेश या तीन नावांचा उल्लेख असून प्रेमभंगातून ही पत्रकबाजी करण्यात आल्याचे दिसून येते आहे. एका तरुणीविषयी आक्षेपार्ह मजकूर या पञकात असल्याने पोलिसांनी तत्काळ या पोस्टरला काढुन कार्यवाई केली आहे.
खालीलप्रमाणे पोस्टरमध्ये मजकूर छापला आहे
स्वप्नाली आणि मी कॉलेजमध्ये असल्यापासून रिलेशनशिपमध्ये होतो. घरच्यांच्या विरोधात जाऊन आम्ही लग्न देखील केले, पण ती मला काही महिन्यांपूर्वी सोडून गेली, तिचं माझ्या आईशी पटत नव्हते, तिला माझ्या घरच्यांसोबत राहायचे नव्हते, आता ती शैलेश नामक तरुणाशी लग्न करत आहे. ती पैशांसाठी त्याच्याशी लग्न करत असून नवरा- बायकोचं नाते सोडून कोणी जातं का?जी मला सोडून जातेय ती दुसऱ्याची काय होणार? तू कुठेही जा स्वप्नली मी तुला राहूच देणार नाही’अशा आशयाचे पञक आहे