वायसिएम रुग्णवाहिकेच्या चालकाने वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून 1000 मास्कचे केले वाटप
पिंपरी (वास्तव संघर्ष) -पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील(वायसीएम) रुग्णवाहिकेच्या चालकाने वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून 1000 मास्कचे वाटप केले आहे . घरकुल चिखली परिसरात राहणारे मारुती जाधव असे या चालकाचे नाव आहे . आज शनिवारी (दिनांक. 2) त्यांचा वाढदिवस होता वाढदिवसानिमित्त त्यांनी परिसरात मास्क वाटप केले आहे .
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च न करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी विविध परिसरातील गरजू नागरिकांना आवश्यक असणाऱ्या मास्कचे मोफत वाटप केले . यामध्ये वायसीएम रुग्णालय , संभाजी नगर , चिखली , घरकुल , चिखली पोलीस स्टेशन , पिंपरी पोलीस स्टेशन येथील पोलिस कर्मचारी , पोलीस मित्र व वृद्ध नागरिकांना स्वसरंक्षणासाठी मास्क चे वाटप करण्यात आले .
तोंडात साखर, पायात भिंगरी व डोक्यावर बर्फ घेऊन फिरणारा आणि एकही शत्रू नसणारा, शत्रूलाही मित्र बनवून कोणताही मोहीम यशस्वी करणारा तसेच पक्षीय, वैचारिक अभिनिवेश न बाळगता सतत काम करणारा आमचे आमदार ‘पै. महेशदादा लांडगे ‘यानांच आपला राजकीय गुरू मानणारा, मी पणाचा बाधा न झालेला आरोग्य दूत युवा कार्यकर्ता ‘श्री मारूती जाधव’ अशी भावना वाढदिवसानिमित्त चिखलीतील घरकुल रहिवाश्यांनी व्यक्त केली..
यावेळी , कीर्ती जाधव, विशाल गरड, अविनाश काळे, प्रसाद ढमढेरे क्राईम पी आय राजेंद्र निकाळजे साहेब (पिंपरी पोलीस स्टेशन) आदी उपस्थित होते