बातम्यामहाराष्ट्र

वास्तव संघर्ष बातमीची दखल ;अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी मागासवर्गीय शिष्यवृत्ती बाबतच्या निर्णयाला दिली स्थगिती

दिपक साबळे….!

पिंपरी (वास्तव संघर्ष) महाराष्ट्र राज्य शासन समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकताच अनुसूचित जाती एससी-एसटी प्रवर्गासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृतीमध्ये क्रिमीलेयर ची अट दिली आहे. यामध्ये त्यांनी एससी – एसटीचा विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जात असेल तर त्याला सहालाख उत्पन्न दाखवून क्रिमीलेयर काढणे बंधनकारक केले होते. ही अट अयोग्य असून यावर फेरविचार करण्यासंबंधीचे लाखो ईमेल त्यांना पाठवून मुंडे यांच्याविरोधात आॅनलाईन आंदोलन छेडण्यात आले होते.

यामध्ये वास्तव संघर्षने महाराष्ट्रात सर्वप्रथम संबंधित वृत्ताला प्रसिद्धी दिली. त्याचीच दखल म्हणून आज सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटरवरून 6 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसु नये या अटीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. या आॅनलाईन आंदोलनात अनेक सोशलमिडीयावर आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थी, कार्यकर्ते, संस्था, संघटना यांनी सहभाग नोंदविला असून त्यांचा दबावामुळेच आज मंञी धनंजय मुंडे यांना निर्णय मागे घ्यावा लागला आहे.

Share this: