भोसरीच्या रुग्णालयास स्व. दत्ताकाका साने यांचे नाव द्या – विरोधी पक्षनेते, नाना काटे
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक दत्ताकाका साने हे सक्रिय नगरसेवक होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भोसरीच्या रुग्णालयास स्व. दत्ताकाका साने यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
काटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, दत्ताकाका साने जनतेच्या कामासाठी ते नेहमी अग्रेसर असत. लॉक डाऊनच्या काळात त्यांनी हजारो नागरीकांना मदत केली. मदत करत असतानाच त्यांना कोरोना झाला व त्यातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. चिखली परीसरच नव्हे तर संपूर्ण शहराच्या विकासाबाबत नेहमी जागरुक असत, विशेषत: भोसरी विधानसभा संघाकडे त्याचे लक्ष होते.
त्यामुळे त्यांच्या कार्यांची कायमस्वरुपी ओळख राहण्यासाठी पालिकेच्या भोसरी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयास दत्ताकाका साने यांचे नाव दिल्यास हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. व याबाबत पालिकेच्या प्रकल्पास त्यांचे नाव देण्याबाबत सर्व पक्षीय सदस्यांनी सभागृहात देखील मागणी केली आहे.
त्या अनुषंगाने भोसरी येथील नव्याने बांधण्यात आलेले मनपाचे सर्व सोयीनीयुक्त अशा रुग्णालयास स्व.दत्ताकाक साने यांचे नाव देण्यात यावे असे देखील त्यांनी म्हटले आहे