क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

कुख्यात वाळू तस्कर सोमाभाई चव्हाण याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) :- सातारा जिल्ह्यातील कुख्यात वाळू तस्कर सोमनाथ उर्फ सोमाभाई चव्हाण याला पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली आहे . त्याच्याकडून चार पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत . तर अन्य एकाला अटक करून त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत . युनिट चारने जुलै 2020 मध्ये अवैध अग्निशस्त्रांचा व्यापार करणा – या मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला होता . त्यावेळी पोलिसांनी 19 लाख 89 हजार 500 रुपये किमतीच्या 42 पिस्टल , गावठी कट्टे आणि 64 काडतुसे जप्त केली होती . 15 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती . तर आणखी काही जणांची नावे निष्पन्न झाली होती . नावे निष्पन्न झालेल्या आरोपींना अटक करून कारवाई करण्याचे पोलिसांचे सत्र सुरु होते .

दरम्यान , युनिट चारच्या पथकातील सात पोलिसांना कोरोनाची लागण झाली आणि हा तपास बारगळला . सर्व पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु करण्यात आला . संतोष चंदू राठोड ( वय 23 , रा . तळेगाव दाभाडे ) याचे नाव पोलिसात तपासात निष्पन्न झाले होते . आरोपी संतोष याच्यावर 2018 साली लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे . त्यामध्ये त्याला अटक झाली होती काही दिवसांपूर्वी आरोपी संतोष त्या गुन्ह्यात येरवडा कारागृहातून बाहेर आला होता . पोलिसांना याची माहिती मिळाली , पोलिसांनी संतोषला 10 ऑगस्ट रोजी चिंचवड परिसरातून अटक केली आणि त्याच्याकडे चौकशी करत एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली . याच प्रकरणात सातारा जिल्ह्यातील कुख्यात वाळू तस्कर सोमनाथ उर्फ सोमाभाई रमेश चव्हाण ( वय 30 , रा . कालगाव , ता . कराड , जि . सातारा ) याचेही नाव निष्पन्न झाले होते . त्याला उंब्रज पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याप्रकरणी तसेच शासकीय सेवकाला काम करण्यास अडथळा आणल्याप्रकरणी अटक केली होती . सोमनाथ सातारा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन पिंपरी – चिंचवड पोलिसांनी त्याला 17 ऑगस्ट रोजी कारागृहातून ताब्यात घेतले .

त्याच्याकडे चौकशी करत पोलिसांनी चार गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली . आरोपी सोमनाथ हा कुख्यात वाळू तस्कर आहे . त्याची सातारा परिसरात शूट ग्रुप ‘ नावाची गुन्हेगारी टोळी आणि आई साहेब प्रतिष्ठान ‘ नावाची संघटना आहे . त्याची सातारा , सांगली , कोल्हापूर आणि ठाणे या जिल्ह्यात दहशत आहे . त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे 18 गुन्हे दाखल आहेत . सन 2016 साली निगडी परिसरात कुख्यात गुंड कृष्णा डांगे उर्फ केडी भाई याच्या खून प्रकरणात सोमनाथ चव्हाण मुख्य आरोपी होता . तसेच सन 2018 साली भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्षावर झालेल्या खुनी हल्ल्यातील सोमनाथ हा मुख्य सूत्रधार होता .

गुन्हे शाखा युनिट चारने आजवर या प्रकरणात 47 गावठी पिस्टल आणि 68 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत . ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई . अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) सुधीर हिरेमठ , सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे , सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख , पोलीस कर्मचारी प्रविण दळे , नारायण जाधव , संजय गवारे , धर्मराज आवटे , दादाभाऊ पवार , अदिनाथ मिसाळ , संतोष असवले . तुषार शेटे , लक्ष्मण आढारी , मोहम्मद गौस नदाफ , वासुदेव मुंडे , शावरसिध्द पांढरे , प्रशांत सैद , सुनिल गुट्टे , तुषार काळे , सुरेश जायभाये , अजिनाथ ओंबासे , धनाजी शिंदे , सुखदेव गावंडे , गोविद चव्हाण , नागेश माळी , राजेंद्र शेटे यांच्या पथकाने केली आहे .

Share this: