क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

२४ तोळे सोन्याचे दागिने आणि ४० हजार रुपये घेऊन फरार झालेल्या आरोपीला सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) : काही दिवसांपूर्वी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून २४ तोळे सोन्याचे दागिने आणि ४० हजार रुपये घेऊन फरार झालेल्या आरोपीला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. सांगवी पोलिसांनी आरोपीला फेसबुकवरून तरुणीच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढले आणि पिंपळे गुरव परिसरात भेटायला बोलावून बेड्या ठोकल्या.

संदीप भगवान हांडे (वय-25 सध्या रा. वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे मुळ गाव पिंपळखेडा ता. गंगाधर जि. औरंगाबाद ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी संगीता अजित कांकरिया यांच्या घरातून अज्ञात व्यक्तीने २४ तोळे सोन्याचे दागिने आणि ४० हजार रुपये रक्कम लंपास केली होती. त्यानुसार सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता , काही दिवसांपूर्वी फिर्यादी संगीता यांच्या घरी केअर टेकर म्हणून आरोपी संदीप हांडे हा कामाला होता. मात्र त्याने काही दिवसातच काम सोडले होते. त्याच्यावर घरातील व्यक्तींचा संशय होता, त्यानुसार पोलिसांना याची माहिती दिली.

आरोपीचा माग कसा काढायचा असा प्रश्न सांगवी पोलिसांसमोर होता. अखेर पोलिसांनी शक्कल लढवत आरोपी संदीप हांडेला तरुणीच्या नावे फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. काही तास वाट पाहिल्यानंतर आरोपी संदीपने रिक्वेस्ट ला प्रतिसाद दिला आणि पोलिसांनी तरुणीच्या नावे त्याच्यासोबत चॅटिंग सुरू केले. अवघ्या काही तासातच संदीपला विश्वासात घेतले. आणि त्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढून पिंपळे गुरव परिसरात भेटायला बोलावून अटक केली.

सदरची कामगीरी मा . पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश . अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे स

पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्री आनंद भोईटे साो , मा . सहा . पोलीस आयुक्त वाकड विभाग श्री गणेश बिरादार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी पोलीस ठाणे श्री रंगनाथ उंडे , व पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) श्री अजय भोसले , तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक यशवंत साळुके , पोलीस हवालदार चंद्रकांत भिसे , पोलीस नाईक कैलास केंगले , सुरेश भोजणे , रोहिदास बोहाडे , पोलीस शिपाई अरुण नरळे , शशीकांत देवकांत , नितीन खोपकर , अनिल देवकर , शिमोन चांदेकर यांनी केली आहे .

Share this: