लढा यूथ मूव्हमेंट कडून 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

निगडी (वास्तव संघर्ष) – जगभरात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन फिजिकल डिष्टसिंग चे पालन करत उरुवेला महाबुद्ध विहार या ठिकाणी लढा यूथ मूव्हमेंट आयोजित 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व सम्राट अशोक विजया दशमी दिन सामुदायिक बुद्धवंदना पठण करून उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडी चे रजनीकांत क्षीरसागर उपस्थित होते .

प्रमोद क्षिरसागर यांनी आपल्या भाषणात म्हंटले की “वर्षानुवर्ष गुलामगिरीत असणार्‍या समाजाला खर स्वातंत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथील दीक्षाभूमि या ठिकाणी दिले. सत्याची आणि विज्ञानाची वाट दाखवणारा बुद्ध धम्म बाबासाहेबांनी लाखो लोकांना दिला त्याबद्दल त्यांना कोटी कोटी प्रणाम”

लढा यूथ मूव्हमेंट चे प्रमुख प्रमोद क्षिरसागर, धम्मक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे धम्मप्रकाश क्षीरसागर, रमेश शिरसाठ, बापू कांबळे, चंद्रकांत कांबळे, अमित गोरे, भैय्यासाहेब ठोकळ, सिद्धार्थ मोरे, समाधान कांबळे, संदीप माने, आप्पा कांबळे, राकेश माने, गौतम कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this: