क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

ट्रान्सपोर्ट कंपनीच्या नावावर खंडणी उकळणा-या आरोपीला अटक;आरोपीकडून 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

निगडी (वास्तव संघर्ष) :-पिंपरी चिंचवड शहरातील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या नावाचा वापर करून घरातील सामान संबंधित मालकाच्या घरी पोहोच न करता त्या बदल्यात खंडणी उकळणा-या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे . अटक आरोपीकडून 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

विरेंद्रकुमार रामकिशन पुनिया ( वय 25 , रा . सध्या ट्रान्सपोर्टनगर , निगडी , मुळगाव जि . चुरु , राजस्थान ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे .

आज आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी याबाबत माहिती दिली ते म्हणाले , आरोपी विरेंद्रकुमार रामकिशन पुनिया याने व्हीआरएल या नामांकित ट्रान्सपोर्ट कंपनीच्या नावाचा गैरवापर करून निगडी येथे ‘ व्हीआरएल कार्गो इंडिया पॅकर्स ‘ हि बनावट कंपनी स्थापन केली . या कंपनीच्या माध्यमातून राजेश नायक यांचे घर सामान पुण्यातून मँगलोर येथे शिफ्ट करायचे होते . त्यासाठी 11 हजार रुपये भाडे ठरले होते . आरोपीने भाड्याच्या ठरलेल्या रकमेतील आठ हजार घेऊन देखील घर सामान स्वत : कडे ठेवले , तसेच सामान हवे असल्यास 9 हजार रुपये खंडणी स्वरुपात वसूल केली.

फसवणूक झाल्याने राजेश नायक यांच्यावतीने त्यांचे मित्र आशिष गावडे यांनी कर्वेनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली . गुन्हा निगडी परिसरातील असल्याने निगडी पोलिसांनी तपास सुरू केला . पोलिसांच्या तपासात निगडीत अशी कोणतीही कंपनी नसल्याचे निष्पन्न झाले . गुन्हयातील आरोपीने VRL CARGO या नामांकीत कंपनीच्या नावाचा गैरवापर करुन अनेक लोकांची फसवणुक करुन खंडणी उकळली असल्याचे तपासात समोर आले.खंडणी विरोधी पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले . निगडीच्या गोडाऊन मध्ये ठेवलेले घर सामान , मोफेड , एक मोबाईल असे एकूण 1 लाख 60 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

Share this: