बातम्या

पिंपरी चिंचवड पालिकेच्या नगरसेविका अर्चनाताई बारणे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका अर्चनाताई तानाजी बारणे यांचे आज मंगळवारी (दि.13 ) रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले. तसेच प्रभागात त्या कोरोना काळात सर्वात जास्त अॅक्टीव नगरसेवक म्हणून प्रसिद्ध होत्या.

थेरगाव भागातील प्रभाग क्र 23 येथे भाजपच्या चिन्हावर त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. अर्चनाताई बारणे यांच्यावर काही दिवसांपूर्वी खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते माञ उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला. त्यांच्यावर आज थेरगाव स्मशानभूमीत आज राञी 8 वाजता अत्यंविधी होणार आहे

Share this: