बातम्या

मार्क वाढवून देण्याच्या बदल्यात तरुणीकडे शरीरसुखाची मागणी ;शिक्षकाच्या तोंडाला काळे फासून बेदम मारहाण

पुणे (वास्तव संघर्ष) : पुण्यातील शनिवारी वाडा शेजारील देसाई काॅलेजच्या एका नराधम शिक्षकाने बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मार्क वाढवून देण्याच्या बदलात शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाच्या तोंडाला काळे फासून बेदम मारहाण करण्यात आली आहे .तसेच या शिक्षकाची पुण्यातील रस्त्यावरून धिंड काढत त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे .

अभिजित पवार असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे .

पुण्याच्या शनिवारी वाडा शेजारील देसाई काॅलेज नावाचे महाविद्यालय आहे . मागील अनेक दिवसांपासून अभिजित पवार हा शिक्षक संबंधित तरुणीकडे बारावीमध्ये गुण वाढवून तसेच वर्गात टाॅप आणण्याचे आमिष दाखवून शरीरसुखाची मागणी करत होता . मात्र संबंधित तरुणीने त्याला वारंवार नकार दिला होता . त्यानंतर या शिक्षकाने संबंधित तरुणीला पैशाची आॅफर दिली. यालाही या तरूणीने नकार दिला. तरीदेखील या शिक्षकाचा जाच सुरू होता . अखेरीस या तरुणीने संबंधित शिक्षकाचा फोन कॉल रेकॉर्ड केला आणि घरच्यांना दाखवला .

त्यानंतर आज दुपारच्या सुमारास संबंधित तरुणीच्या नातेवाईक आणि गनिमी कावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयात जाऊन संबंधित शिक्षकाला जाब विचारला . तर काहींनी त्याच्या तोंडावर शाई टाकत मारहाणही केली . त्यानंतर महाविद्यालयापासून ते विश्रामबाग पोलीस ठाण्यापर्यंत या शिक्षकाची धिंड काढण्यात आली . संतप्त झालेल्या जमावाने मारहाण करतच या शिक्षकाला पोलीस ठाण्यात आणले.

Share this: