क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

बबलू सोनकर अमर मूलचंदानीसह 39 आरोपींवर गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरातील उद्योजक बबलू सोनकर दि सेवा विकास को ऑप बँकेचे तत्कालीन चेअरमन अमर मूलचंदानीसह 39 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचालक मंडळ आणि बँक अधिका – यांनी केलेल्या बोगस कर्ज वाटपामध्ये तब्बल 429.57 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे . सहकार विभागाने केलेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला.

सहनिबंधक , सहकारी संस्था ( लेखापरीक्षण ) राजेश उद्धवराट जाधवर ( वय 50 ) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार , सहकारी संस्थेकडून दि सेवा विकास को ऑप बँकेचे लेखापरीक्षण करण्यात आले . त्यात बँकेची 50 लाख रुपये रकमेपेक्षा अधिक रकमेची 204 कर्ज प्रकरणे तपासण्यात आली . त्यातील 124 कर्ज प्रकरणांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले . 124 कर्ज प्रकरणांबाबत कर्ज मंजुरीपूर्व व पश्चात एकूण 429.57 कोटी रुपयांचा गैरव्यवहार , अपहार , फसवणूक झाल्याचे उघडकीस आले . या लेखपरिक्षणाचा अहवाल 6 ऑगस्ट रोजी सादर करण्यात आला . या अहवालामध्ये दि.सेवा विकास को.ऑपरेटिव्ह बँकेत विविध कर्ज प्रकरणामध्ये आर्थिक अनियमीतता , गैरव्यवहार , अपहार अफरातफर , फसवणूक व लबाडी केल्याचे निष्पन्न झाले आहे . त्यामुळे सदर गैरव्यवहारास जबाबदार असणा – या व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे सहकार आयुक्तांनी आदेश दिले .

दि.सेवा विकास को.ऑप बँकेचे तत्कालीन चेअरमन , संचालक मंडळ , बँक अधिकारी व कर्जदार समुहनिहाय यांच्यावर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल आहेत . त्यानंतर आता नव्याने पिंपरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . उर्वरीत प्रकरणांमध्ये आणखी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले .

चेअरमन अमर साधुराम मुलचंदानी संचालक मंडळ आरोपी – मनोहर साधुराम मुलचंदानी , डॉ . गुरुबक्ष मतनानी , विजयकुमार गोपीचंद रामचंदानी , नरेंद्र पांडुरंग ब्राम्हणकर , पंकज प्रकाश मसंद , धीरज साधु भोजवानी , भारती प्रकाश नंद , दया अशोक मुलचंदानी , दिपा जीवत मंगतानी , राजेश पोपट सावंत , चंद्रशेखर अहिरराव , अशोक साधुराम मुलचंदानी , प्रकाश शिवनदास पमनानी व इतर . बँकेचे अधिकारी आरोपी मुख्य कार्यकारी अधिकारी टी एन लखानी , मुख्य कार्यकारी अधिकारी ए एम बासी , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एच टी मुलानी ( मयत ) , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नि शर्मा , सहमुख्य कार्यकारी अधिकारी आर के हिंदुजा , सहाय्यक प्रमुख निलम सोनवाणी , उप मुख्य कार्यकारी अधिकारी जे . पी . जगवानी व इतर कर्जदार आरोपी – सागर सुर्यवंशी , शितल सुर्यवंशी ( तेजवाणी ) समुह , विनय आ – हाना , विवेक आ – हाना व दिप्ती आ – हाना , रोझरी ग्लोबल एज्यकेशन संस्था , धर्मेंद्र यांनी काम उर्फ बबलू ब्रिजलाल सोनकर व सोनकर समुह , इतर 37 कर्जदार समुह व वैयक्तीक कर्जदार.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) सुधीर हिरेमठ , सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कटटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची ( एसआयटी ) स्थापना केली आहे . यामध्ये पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर , पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत , पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ , पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांचा सहभाग आहे . एसआयटी कडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे .

Share this: