क्राईम बातम्यामहाराष्ट्र

सासरच्या छळाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ;आरोपींना अटक करण्याची मागणी

पुणे (वास्तव संघर्ष) : पुण्यातील वाघोलीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवीन व्यवसाय करण्यासाठी माहेरहून पैसे न आणल्यामुळे सासरच्यांनी सूनेचा छळ केला . तिच्या चारित्र्यावर संशय घेत शारीरिक व मानसिक त्रास दिला . या छळाला कंटाळून महिलेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली . ही घटना शनिवारी (दि.07) ऑगस्टला वाघोलीतील दुबेनगरमध्ये घडली .

कोमल रूपेश उर्फ अंकुश अशोक इंगवले ( वय 29 ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे .

ओंकार नखाते यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल आणि रूपेश यांचे जून 2019 मध्ये लग्न झाले होते . लग्नानंतर रूपेश आणि त्याच्या नातेवाईकांनी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कोमलला माहेरहून पैसे आणण्यास सांगितले . तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला . या छळाला कंटाळून कोमलने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली .याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे अधिक तपास करीत आहेत .

कोमल इंगवले यांच्या आत्महत्या प्रकरणी आरोपींना शिक्षा देण्याची मागणी पुणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे. या गुन्ह्यात कोमलचे पती आणि नातेवाईकांना लवकरात लवकर पोलीसांनी अटक करून या आरोपींना शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Share this: