क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

बोगस वकिल बनून केले सात फ्लॅटचे रजिस्ट्रेशन ;भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष ): पिंपरी चिंचवड शहरातील दापोडीत एका व्यक्तीची 13 लाख आठ हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वकील असल्याचे सांगून एका व्यक्तीचा विश्वास संपादन करून दापोडी येथील दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्रमांक 25 येथे बनावट कागदपत्रे तयार केली. त्याद्वारे सात फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करून व्यक्तीची 13 लाख आठ हजारांची फसवणूक केली. हा प्रकार 18 आणि 19 मे 2021 या दोन दिवसात घडला आहे.

अमित दत्तात्रय घुले (वय 42, रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली) यांनी गुरुवारी (दि. 26) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रसन्न शिरुडकर (वय 41), शर्वरी प्रसन्न शिरुडकर (वय 40, दोघे रा. मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घुले त्यांच्या ओळखीचे ॲड. पठाण यांना भेटण्यासाठी गेले असता तिथे त्यांची आरोपींसोबत ओळख झाली. आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत ओळख वाढवून तुमचे दस्त करून देतो, असे सांगून घुले यांचा विश्वास संपादन केला.प्रसन्न शिरुडकर हे वकील नसताना त्यांनी घुले यांना तसे सांगितले. फिर्यादी यांचे मांजरी बुद्रुक येथील शारदा कॉम्प्लेक्स व शारदा सुमन आर्केड या बिल्डिंग मधील 13 फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करून देतो असे सांगितले. त्यासाठी घुले यांच्याकडून सातबारा उतारा, आठ (अ) उतारा, फ्लॅट विक्रीचे मूळ दस्त घेतले. सात फ्लॅटचे 18 आणि 19 मे या दोन दिवसात दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्रमांक 25, दापोडी येथे बनावट रेरा व पीएमआरडीए नोंदणीचे कागदपत्र बनवून त्याचा वापर करून रजिस्ट्रेशन करून फिर्यादी घुले यांची 13 लाख आठ हजारांची फसवणूक केली. अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Share this: