धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा अन्यथा तीव्र आंदोलन करू -अजित चौगुले
महाराष्ट्र (वास्तव संघर्ष) :धनगर समाजाचा एस टी आरक्षण अंमलबजावणी प्रश्न गेली अनेक दिवस प्रलंबित आहे राज्यातील सर्व सत्ताधारी व विरोधी पक्षांनी अनेक दिवसांपासून धनगर समाजाला आश्र्वासन देऊन त्यांची घोर फसवणूक करण्याचे काम केले आहे . सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री यांनीही २०१९ ला पंढरपूर येथे धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते .
तसेच राष्ट्रवादी व काँग्रेस यांनीही त्यांच्या जाहीरनाम्यात धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते.पन आज सत्ताधारयांसह विरोधी पक्ष भाजप या सर्वांना धनगर समाजाच्या आरक्षणाचा विसर पडल्याचे दिसत आहे.याची आठवण करून देण्यासाठी महाराष्ट्र यशवंत सेनेच्या वतीने राज्यभर तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहेत . पिंपरी-चिंचवड आकुर्डी येथे तहसीलदार कार्यालयात महाराष्ट्र यशवंत सेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख श्री अजित चौगुले यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
यावेळी शहर समन्वयक श्री सत्यवान वाघमोडे सर, प्रसिद्धीप्रमुख श्री विकास आबा माने यांच्या सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी सरकारने लवकरात लवकर धनगर समाजाचा एसटी आरक्षण प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख श्री अजित राजाराम चौगुले यांनी दिला आहे.