बातम्या

समाज आणि देश हितासाठी जेलमध्ये जाणे हा आमचा अलंकार- अण्णा हजारे


वाास्त संघर्ष आॅनलाईन ‘ :- समाज आणि देश हितासाठी जेलमध्ये जाणे हा आमचा अलंकार आहे. चारवेळेला जेलमध्ये गेलो, पण ज्या ज्या वेळेला मला जेलमध्ये टाकले ते ते सरकार पडले. त्यामुळे सत्य कधी सोडू नये, ते कधीच पराजीत होत नाही. तसेच, ‘देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जे जे लढले त्यांना कधीही विसरू नका,’ असे विचार पद्मभूषण अण्णा हजारे यांनी मांडले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने देण्यात येणारा ‘श्यामची आई सन्मान’ सोहळा आज (दि. 23) राळेगणसिद्धी येथे संपन्न झाला. यावेळी टाटा मोटर्सचे विरिष्ठ निवृत्त अधिकारी मनोहर पारळकर आणि त्यांच्या आई सुशिला पारळकर यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते ‘श्यामची आई’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अण्णा हजारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार होते.


यावेळी नारायण सुर्वे, साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे दिनेश आवटी, निवड समितीचे प्रमुख कवी उद्धव कानडे, जेष्ठ साहित्यिक विश्वास वसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.अण्णा हजारे पुढे म्हणाले, ‘शब्दाला कृतीची जोड दिली पाहिजे त्यासाठी आपले आचार विचार शुद्ध असले पाहिजेत. जीवन निष्कलंक असावे. त्याग जीवनात फार महत्वाचा असतो तसेच शिक्षणातून माणूस घडत गेला पाहिजे’ असे विचार अण्णा हजारे यांनी मांडले. ‘सत्य की नाव हिलती है, डुलती है लेकीन, डूबती कभी नही’ त्यामुळे सत्य कधी सोडायचं नाही. तसेच, कथनी पेक्षा करणीवर भर देऊन उत्तम काम करत रहावे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कामाला माझ्या शुभेच्छा.’ असे अण्णा हजारे म्हणाले. 




Share this: