ओटास्किम निगडीत एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न ;गुंडाच्या दहशतीमुळे दुकाने, टप-या झाल्या बंद
निगडी (वास्तव संघर्ष) : जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकाला संगणमत करून तठार मारण्याचा कट करत लोखंडी कोयत्याने मारहाण करण्यात आली आहे. ही घटना मंगळवार (दि. 28)रोजी अकुंश चौक ओटास्किम निगडी येथे राञी साडेनऊच्या सुमारास घडली आहे.
शहानवाज मुस्ताक शेख (रा. भिमक्रांतीनगर झोपडपट्टी , भंगार दुकानाचे जवळ, ओटास्किम निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिपक पवार, शाहिद ऊर्फ कल्लू पठाण , ज्योतीराम ऊर्फ बिड बळीराम हणवते, रफिक ऊर्फ गदया शमशोडीन बगवान ( सर्व. राहणार पि.सी एम.सी. वसाहत , ओटास्किम , निगडी)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी राञी साडेनऊच्या सुमारास फिर्यादी शहानवाज यांचा मित्र शाहिद ऊर्फ कल्लू याने फिर्यादी शहानवाज यांना त्यांच्या राहत्या घरातून चल बाहेर फिरायला जावू असे म्हणून फिर्यादी शहानवाज यांच्या खांदयावर हात टाकून अंकुश चौक येथील भाजी मंडईचे पाठीमागे असलेल्या बुध्द विहार ओटास्किम निगडी येथे घेवून गेले. त्यानंतर त्याने व त्याच्या तीन साथीदार ज्योतिराम ऊर्फ बीड , रफिक ऊर्फ गदया व दिपक पवार यांनी संगणमत करुन जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादी शहानवाज यांना जीवे ठार मारण्याचा कट रचून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच आरोपी दिपक पवार याने लोखंडी कोयता फिर्यादीच्या डोक्यात जीवे ठार मारण्याचे उद्देशाने मारुन फिर्यादी यांना गंभीर जखमी केले आहे . तसेच फिर्यादी यांचा पाठलाग करित असताना भाजी मंडई परिसरामध्ये दहशत निर्माण केली . त्यावेळी त्याचे दहशतीने लोकांनी दुकाने, टप-या बंद केल्या. आरोपी दिपक पवार याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ओमासे करीत आहेत.