क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

डिलक्स मॉलच्या पाचव्या मजल्यावरील मसाज सेंटरवर पिंपरी पोलीसांची धाड

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरीतील डिलक्स मोबाईल मार्केट मॉलच्या पाचव्या मजल्यावर इलाईट वेलनेस स्पा मसाज सेंटरवर पोलिसांनी धाड टाकून एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवार (दि. 12)
सायंकाळी पावनेसहाच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक सुबराव गवारे यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार एका अज्ञात महिलेवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी
सायंकाळी पावनेसहाच्या दरम्यान पिंपरीतील डिलक्स माॅल इलाईट वेलनेस स्पा मसाज सेंटरवर आरोपी महिलेने  दोन महिला यांना स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसायाकरिता ठेवल्याचे पोलीसांना माहीती मिळाली त्या महिलांना आरोपी महिलेने पैशांचे अमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले.तसेच त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेऊन त्यातून मिळालेल्या रक्कमेतून स्वतःची उपजिवीका भागवित असताना मिळून आल्या. आरोपी महिला फरार असून अधिक तपास पिंपरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिसाळ करित आहेत.

Share this: