क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

हातात तलवार घेऊन अजंठानगरमध्ये गुंडाची दहशत ;पोलीसांनी ठोकल्या बेड्या

निगडी (वास्तव संघर्ष) : एकाला शिवीगाळ करत हाताने मारहाण तसेच हातात तलवार घेऊन अजंठानगरमध्ये एका गुंडाने दहशत केली आहे. या आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवार (दि. 12)रोजी साडेतीनच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळ  सी पत्राशेड अजंठानगर चिंचवड येथे घडली आहे.

कल्याण ऊर्फ आबा भिवा सोनवणे (वय-52, रा , पाण्याच्या टाकीजवळ , सी पत्राशेड , अजंठानगर चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अक्षय फुलचंद गाडे (वय अंदाजे-25, रा – सी पत्राशेड , चिंचवड पुणे अजंठानगर) असे गुन्हा दाखल तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी साडेतीनच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळ अजंठानगर येथे आरोपी अक्षय याला फिर्यादी कल्याण यांनी ‘विनाकारण पाणी उपसु नको’ असे सांगीतल्याने त्याचा राग मनात धरून आरोपी अक्षय याने  फिर्यादी कल्याण यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली व त्यानंतर काही वेळाने एक लोखंडी तलवारी हातात घेऊन फिर्यादी कल्याण यांच्या दिशेने घेवुन अजंठानगर पत्राशेड मध्ये राहणा या लोकांना म्हणाला”आज या आबाची विकेटच पाडतो ” अशी धमकी देवुन तसेच हातामध्ये हत्यार घेवुन आरडाओरडा करत अजंठानगर येथे राहणाऱ्या लोकांमध्ये दहशत व भिती निर्माण केली. आरोपीला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सोनटक्के करित आहेत.

Share this: