पिंपरीत तरुणाला लाथाबुक्यांनी मारहाण करुन ब्लेडने केला वार

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरीतील बसस्टॉपच्या समोर डॉ. आंबेडकर पुतळ्याकडून नेहरूनगर कडे जाणा-या रोडवर रिक्षामधून आलेल्या पाच जणांनी एका तरुणाला लाथाबुक्यांनी मारहाण करुन ब्लेडने वार केला आहे. ही घटना मंगळवारी (दि.28) रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली आहे.

अज्ञात आरोपीविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फय्याज राशद शहा (वय-29,धंदा गॅरेज व जुने गाड्या खरेदी विक्री कमिशनवर काम , रा . दत्तमंदिर जवळ , दत्तनगर चिंचवड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास  पिंपरीतील आंबेडकर चौकाजवळील  बसस्टॉपच्यासमोर डॉ. आंबेडकर पुतळ्याकडून नेहरूनगर जाणा-या रोडवर पिंपरी  याठिकाणी टिव्हीएस कंपनीची काळ्या रंगाची रिक्षा ( नं .MH-14- 2714) मधील पाच आरोपींनी फिर्यादी फय्याज यांना लाथाबुक्यांनी तसेच बांबुने आणि एका आरोपीने हातावर ब्लेड मारून  जखमी करत  रोख रूपये पाकिट मोबाईल जॅकेट अशा वस्तु एकुण किंमत 1,40,300 चा माल जबरदस्तीने काढुन फरार झाले आहेत. अधिक तपास पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सावर्डे करित आहेत.

Share this: