बातम्या

आता तरी सुधरा पुणेकरांनो, आता तरी सुधरा, सात वर्षाच्या कार्तिक ने केले पुणेकरांना आवाहन

पुणे(वास्तव संघर्ष) : शहरात सध्या कोरोना विषाणू ची रुग्ण संख्या परत एकदा वाढत आहेत, या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहे, परत एकदा आपल्याला लॉक डाउन ला सामोरे जावे लागणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दिवसेंदिवस या वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील एका सात वर्षीय कार्तिक या मुलाने पुणेकरांना समजदारी चा इशारा दिला आहे.

एवढ्याश्या लहानग्या कार्तिकने पुणेकरांना आवाहन केले आहे की कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटे पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क चा वापर सैनीटाईझर चा वापर , सामाजिक अंतर हे 3 महत्वाचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे या कार्तिकने पुणेकरांना सांगितले आहे कार्तिक हा पुणे शहरातील भाजप च्या पदाधिकारी एडवोकेट मोनिका खलाने यांचा मुलगा असून त्याने यापूर्वीही कोरोना च्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते, आताही तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कार्तिकने पुन्हा एकदा पुणेकरांना आवाहन केले आहे की पुणेकरांनो सावध व्हा स्वतःला कोरोना पासून वाचवा, नियमांचे पालन करा, सामाजिक अंतर ठेवा, मास्कचा वापर करा.

वय पंधरा ते 18 वयोगटातील मुला-मुलींना लसीकरण देणे सुरू करण्यात आले आहे या मुला-मुलींच्या पालकांनाही या लहानग्या कार्तिकने आवाहन केले आहे की आपल्या मुला मुलींचे लसीकरण करून घ्यावे व आपल्या मुलांना सुरक्षित करावे तसेच आता तरी सुधरा पुणेकरांनो, आता तरी सुधरा ! अशा शब्दात कार्तिकने पुणेकरांना आवाहन केले आहे त्याच्या या आव्हानाला पुणेकर नक्कीच प्रतिसाद देतील अशी आशा एडवोकेट मोनिका खलाने यांनी व्यक्त केली आहे.

Share this: