बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सम – विषम व दिवसाआड करण्यात यावी – गीता मंचरकर

पिंपरी(वास्तव संघर्ष ) पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सम – विषम व दिवसाआड करण्यात यावी अशी मागणी नगर सेविका गीता सुशील मंचरकर यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,आयुक्त, पोलीस आयुक्तांलय यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


मंचरकर यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे म्हटले आहे की, कोरोना – कोविड १९ या महामारीचा प्रसार वेगाने होत आहे.भारतामध्ये सर्वात जास्त रुग्ण संख्या महाराष्ट्रात आहे व त्यामुळे मृत्यूचे प्रमाण ही वाढत आहे. महाराष्ट्र शासनाने सर्वोतोपरी उपाय केले आहेत व उत्तम आरोग्य सेवा जनतेसाठी उपलब्ध करून दिली आहे. मुंबई व पुणे सारख्या शहरांमध्ये या विषाणूचा प्रसार वेगाने होताना दिसतोय कारण कोरोना हा रोग संसर्ग जन्य आहे. वाढती रुग्णासंख्या रोखण्यासाठी राज्यसरकार व केंद्रासरकार मार्फत पहिल्यांदा १४ एप्रिल पर्यंत देशभर लोकडाऊन करण्यात आले, त्यात अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू व औषधे वगळण्यात आले,

त्याकरिता लोक रस्त्यावर उतरून गर्दी करू लागले, त्यामुळे संसर्गजन्य असलेला हा रोग अधीकच वाढू लागला, त्यामुळे लोकडाऊन परत ३ मे पर्यंत वाढवावा लागला. परत काही अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सवलत देण्यात आली त्याचाही गैरफायदा काही लोक घेऊन घराबाहेर पडू लागले त्यामुळे ही रूग्ण संख्येत वाढ होऊ लागली.

संसगर्जन्य असल्याने कोरोना वेगाने पसरत आहे.
महाराष्ट्र शासने सर्वतोपरी उपाययोजना केल्या आहेत तसेच सर्वोत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली आहे तरीसुध्दा लोकांच्या घराबाहेर निघण्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. देशातील राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत व मृत्यू ही जास्त झालेत. २०एप्रिल पासून काही उद्योगांना सूट देऊन सुरू करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले होते परंतु तो प्रयोग ही करता आला नाही. राज्य शासनाने रुग्ण संख्या कमी करण्यासाठी राज्यातील काही भाग कंटइनमेंट झोन घोषित केले होते व प्रभावित क्षेत्र रेड, ओरांज,व ग्रीन असे वर्गीकरण केले.


वरील सर्व उपयांसोबतच अजून एक उपाय करावा , तो म्हणजे अति प्रभावित क्षेत्र पूर्ण पणे प्रतिबंधित करणे व जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सम-विषम चा प्रयोग करावा अथवा पुणे मुंबई सारख्या अतिप्रभावीत शहरात कुटूंबिय प्रमुख यांस लाल व हिरवा पास देण्यात यावा. एक दिवस हिरवा पास धारकास जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी परवानगी द्यावी व दुसऱ्या दिवशी लाल पासधारकरकांना परवानगी देण्यात यावी व तिसऱ्या दिवशी पूर्ण पणे बंद पाळण्यात यावा, कशाचीही सूट देण्यात येऊ नये, असाच प्रयोग पूर्ण लोकडाऊन होईपर्यंत करावे त्यामुळे जास्त लोक खरेदीसाठी रस्त्यावर येणार नाहीत व रुग्ण संख्या कमी होण्यासाठी मदत होईल. शंभर टक्के लोक रस्त्यावर येणार नाहीत व जे नागरिक याचे उल्लंघन करतील त्यांना कडक शासन करण्यात यावे. या मुळे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊन या रोगाला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जे धोरण आखलेले आहे ते यशस्वी होईल व रुग्ण कमी होऊन कोरोना – कोविद१९ पूर्णपणे या राज्यातुन हद्दपार होईल.असेही त्या म््हणाल्या

Share this: