पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन
पिंपरी (वास्तव संघर्ष) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन करण्यात आले. तसेच, पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.मोरवाडी येथील पिंपरी-चिंचवड भाजपा जनसंपर्क कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
शहराध्यक्ष तथाबआमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, राजू दुर्गे, विजय फुगे, नगरसेवक तुषार हिंगे, सागर गवळी, कुंदन गायकवाड,अनुराधा गोरखे,शर्मिला बाबर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, उपाध्यक्ष प्रकाश जवळकर ,नंदू दाभाडे, समीर जावळकर, किसन बावकर शहर चिटणीस अनिल लोंढे, अर्जुन ठाकरे, शांताराम भालेकर, राधिका बोर्लीकर, हिरेन सोनवणे, विशाल वाळुंजकर, नंदू कदम, आशा काळे, सचिन राउत, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, युवा मोर्चा सरचिटणीस तेजस्विनी कदम, युवा मोर्चा प्रदेश सदस्य अजित कुलथे, शिवराज लांडगे, मुक्ता गोसावी, सागर घोरपडे, प्रकाश चौधरी, विक्रांत गंगावणे, अनिकेत शेलार, दिव्यांग सेल अध्यक्ष शिवदास हंडे, मंडल अध्यक्ष राजेंद्र लांडगे,विजय शिनकर,गुजराथी सेल अध्यक्ष मुकेश चुडासमा,ओबीसी सेल पश्चिम महाराष्ट्र संयोजक वीणा सोनवलकर,व्यापारी आघाडी सरचिटणीस सतपाल गोयल, मंडल सरचिटणीस नंदू भोगले, आबा मोरे, माजी नगरसेवक बाळासाहेब भुंबे, सहकार आघाडी अध्यक्ष प्रदीप बेंद्रे, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश चिटणीस कोमल शिंदे, ओबीसी सेल सरचिटणीस कैलास सानप,अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष फारूक इनामदार आदी उपस्थित होते.मुर्दाबाद…मुर्दाबाद.. नाना पटोले मुर्दाबाद… अशा घोषणा यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्या.
भंडारा येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. ‘‘आपण मोदीला मारुही शकतो व शिव्याही देवू शकतो…’’ असे वादग्रस्त विधान केल्यामुळे पटोले यांच्याविरोधात संपूर्ण राज्यात भाजपाकडून संताप व्यक्त होत आहे