बातम्या

लोखंडे कामगार भवन येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे नेहरूनगरला स्थलांतर

पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कै. नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन पिंपरी येथील पशुवैद्यकीय विभागामार्फत पाळीव प्राण्यांवर उपचारासाठी सुरु असलेला बाह्यरुग्ण विभाग नेहरुनगर येथील प्राणी सुश्रुषा केंद्र ( डॉग पाउंड ) गवळी माथा रोड , अनुकुल कंपनी समोर दि 1 एप्रिल 2022 पासुन स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी दिली.

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या कै. नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन , पिंपरी येथील पशुवैद्यकीय विभागामार्फत पाळीव प्राण्यांवर उपचारासाठी नेहरुनगर येथे बाह्यरुग्ण विभाग सुरु होता मात्र येथील प्राणी सुश्रुषा केंद्र ( डॉग पाउंड ) गवळी माथा रोड , अनुकुल कंपनी समोर स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

तरी शहरातील नागरिकांनी याबाबतची नोंद घेवून सहकार्य करावे असे आवाहन देखील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण दगडे यांनी केले .

Share this: