क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

‘त्या’ एका चुकीमुळे महिलेचे नग्न फोटो सोशलमिडीयावर झाले व्हायरल

सांगवी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवडमधील एका महिलेचे नग्न फोटो सोशलमिडीयावर व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.शेअर चॅट या सोशलमिडीयावर आपला मोबाईल नंबर शेअर करण्याची मोठी चूक महिलेला महागात पडली आहे. 11 फेब्रुवारी ते एप्रिल 2022 रोजी हा शेअर चॅट या ॲपवर हा प्रकार घडला आहे.

याबाबत पिडीत फिर्यादी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी महिला या गेली एक वर्षापासुन शेअरचाट हे सोशलमिडीयावरील ॲप वापरत होत्या. या शेअरचॅट ॲपवर फिर्यादीने प्रोफाईल बनविले होते व त्यातुन फिर्यादीला आर्थिक उत्पन्न मिळत होते. त्या अ‍ॅपमधील चॅटरुम या ऑप्शनवरुन फिर्यादी महिलेची इतर अनेक लोकांसोबत ओळख झाली. तेव्हा फिर्यादी महिलेचा मोबाईल नंबर हा सर्वाना शेअर झाला. त्यानंतर फिर्यादी महिलेला अनेक नंबरहुन पर्सनल व्हॉटस अ‍ॅपला मेसेज येऊ लागले.

दिनांक 11 फेब्रुवारी 2022 पासुन त्यापैकी काही अज्ञात नंबवरुन फिर्यादी महिलेला अश्लील मेसेज व फोटो एडिट करुन नग्न अवस्थेतील फिर्यादीचे व नातेवाईकाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले. याबाबत फिर्यादीने फोन करून जाब विचारला असता आरोपींनी धमकी दिली. याबाबत माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सांगवी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक रूपनर करित आहे.

Share this: